सध्या हृदयविकाराचा झटका येण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ हैराण करणारे असतात. सध्या असाच एक सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ गाझियाबादचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक तरुण खुर्चीवर बसलेला असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका येतो आणि कोणाला काही समजायच्या आतच त्याचा मृत्यू होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाझियाबाद येथील ३५ वर्षीय जिम ट्रेनर आदिलचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. आदिल आपल्या कार्यालयातील खुर्चीवर बसून आपल्या कर्मचाऱ्यांशी बोलत होता. यावेळी अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. तिथे असलेल्या लोकांना आधी काय झालं हे समजलंच नाही. लगेचच त्यांनी आदिलला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

एकीने केस ओढले, तर दुसरीने…; मुंबई लोकलमधील हाणामारीचा आणखी एक Video Viral

मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय आदिलने काही दिवसांपूर्वीच साहिबाबाद परिसरातील शालिमार गार्डन येथे प्रॉपर्टी डीलिंगचे कार्यालय सुरु केले होते. इतकंच नाही तर त्याचे स्वतःचे जिमदेखील होते. रविवारी १६ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ च्या सुमारास आदिल आपल्या कार्यालयातील खुर्चीवर बसला होता. यावेळी अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खुर्चीवर टेकला. आदिलच्या मागे त्याची चार मुले आणि पत्नी असा परिवार आहे.

फटाक्याची वात पेटवून पळताना भाजपाचा आमदार तोंडावरच पडला; Video Viral

कुटुंबीयांनी सांगितले की काही दिवसांपासून त्याला किरकोळ ताप होता. मात्र तो आपली सर्व कामे अतिशय उत्तमरित्या करत होता. तसेच आदिल स्वतःच्या फिटनेसची विशेष काळजी घ्यायचा. आदिलचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, या गोष्टीवर कोणाचाच विश्वास बसत नाही आहे.

दरम्यान, भाजपाचे खासदार वरून गांधी यांनी हा व्हिडीओ रिट्वीट करत म्हटले आहे, “तरुण निरोगी लोकांमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. कोविडचा आपल्या शरीरावर किती परिणाम झाला आहे यावर सखोल संशोधनाची गरज आहे. कोविडच्या गंभीर रुग्णांसाठी मोफत संपूर्ण शरीर तपासणीची व्यवस्था करावी लागेल. कोणता आणि किती व्यायाम करावा याविषयी जनजागृती करायला हवी.”

ऐकावं ते नवलंच! थकव्यासाठी उपचार घ्यायला गेलेल्या महिलेला कळले ती होणार आई; ४८ तासांतच दिला बाळाला जन्म

काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. जीवनशैलीतील बदल, आयोग्य आहार, अत्याधिक मद्यपान, धूम्रपान, अपूर्ण झोप, तणावयुक्त जीवन, ही याची मुख्य करणे आहेत. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला डॉक्टरांच्या समोरच हृदयविकाराचा झटका आला होता. यावेळी डॉक्टरांनी वेळीच प्रसंगावधान दाखवले आणि रुग्णाला तातडीने सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video a young man suffers a heart attack while sitting in a chair and dies before anyone knows it pvp