केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी पहाटेच्या सुमारास म्हणजेच २ ऑक्टोबरच्या रात्रीपासून ३ ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत मुंबईच्या समुद्रात कार्डेलिया क्रूझवरील एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्जदेखील जप्त करण्यात आलं होतं.  त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले होते. तसेच या क्रूझमधून अभिनेता शाहरुख खानचा मुलगी आर्यनसह आठ जणांना अटक करण्यात आली होती. आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा यांचा समावेश होता. या प्रकरणातील एका तरुणीने सॅनिटरी नॅपकीनमध्ये लपवून ड्रग्स आणल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. आता याच सॅनिटरी नॅपकीनमध्ये ड्रग्स कशाप्रकारे लपवण्यात आलेले यासंदर्भातील एक कथित व्हिडीओ व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपी तरुणीने सॅनिटरी नॅपकीनमध्ये लपवून ड्रग्स आणले होते, असं एनसीबी अधिकाऱ्यांना तपासादरम्यान आढळलं आहे. तसेच अरबाज मर्चंटच्या बुटातून ड्रग्ज जप्त करण्यात आले. तर आर्यनव्यतिरिक्त इतरांनी लेन्स कव्हर, अंडरवेअरमध्ये ड्रग्स लपवले होते. तर मुलींनी सॅनिटरी पॅड्स, पर्सचे हँडल यात ड्रग्स लपवून ठेवले होते, अशी माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुनमुन धमेचाने सॅनिटरी नॅपकीनमध्ये ड्र्ग्स लपवले होते. अरबाज आणि मुनमुन यांच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तिच्या भावाने सर्व आरोप फेटाळून लावत मुनमुनकडे ड्रग्स सापडले नसल्याचं म्हटलं आहे.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये जहाजामधील एका खोलीतून मिळालेल्या सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्स सापडले. ही रुम मुनमुनची होती, अशा माहितीसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. मात्र या व्हिडीओची सत्यतेबद्दल काहींनी शंकाही उपस्थित केली आहे.

मुनमुन धामेचा आहे तरी कोण?
मुनमुन धामेचा दिल्लीची रहिवासी आहे. मुनमुन धामेचाचे घर मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील तहसीलीमध्ये देखील आहे. मात्र सध्या त्या घरात कोणी राहत नाही. २३ वर्षीय मुनमुन धामेचा फॅशन मॉडेल आहे. मुनमुन ही मध्य प्रदेशातील एका मोठ्या व्यावसायिकाची मुलगी आहे. मुनमुनच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले होते. तर तिने यापूर्वी तिचे वडील अमित कुमार धामेचा यांना गमावले होते. तिचा एक भाऊ आहे, प्रिन्स धामेचा, जो दिल्लीत काम करतो. मुनमुने शालेय शिक्षण सागर येथे पूर्ण केले. सागरमधील बऱ्याच लोकांना मुनमुनबद्दल माहिती नाही. नंतर, ती सहा वर्षांपूर्वी तिच्या भावासोबत दिल्लीला जाण्यापूर्वी काही काळ भोपाळमध्ये राहिली.

कदाचित मॉडेलिंगद्वारेच ती मोठ्या सेलिब्रिटींच्या संपर्कात आली असेल अशी शक्यता व्यक्त केली जातेय. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींसोबत मुनमुनचे फोटो आहेत. 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video alleges munmun dhamecha hid drugs in sanitary pads in aryan khan drugs case goes viral scsg