Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी थक्क करणारे व्हिडीओ चर्चेत येतात. काही व्हिडीओ धक्कादायक असतात तर काही व्हिडीओ खूप काही शिकवणारे असतात. काही लोक तर त्यांच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी कॅमेऱ्यात कैद करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका आज्जीबाईने चक्क रागात नोटा फाडल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. नेमकं काय घडलं, हे आज आपण जाणून घेऊ या.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आज्जीबाई दिसेल. तिच्यासमोर फाडलेल्या नोटांचे तुकडे दिसेल आणि एक तरुण तिला जाब विचारताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण तिला फाडलेल्या नोटा दाखवतो आणि विचारतो किती रुपये आहे हे? त्यावर आज्जी म्हणजे चाळीस हजार तेव्हा सर्वांना हसू येते. त्या व्हिडीओमध्ये एक महिला सांगते की साडे सात हजार रुपये होते आणि दोन हजार वरून दिलेले असे साडे नऊ हजार होते. या व्हिडीओत आज्जीने रागात नोटा फाडल्याचे दिसत आहे. तरुण तिला समजावून सांगताना दिसत आहे. विशेष म्हणजे आज्जीला सर्व जण प्रेमाने समजावून सांगताना दिसत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

laxmi_bai105 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बाईला राग आला, फाडल्या नोटा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बँकेत दया… काहीतरी पैसे नक्की मिळतील.” तर एका युजरने लिहिलेय, “म्हातारपणी त्यांना लहान लेकराप्रमाणे सांभाळावं लागतं भाऊ। त्यांनी आपल्याला तळहाताच्या फोड़ाप्रमाणे वागवले त्यांच्यापुढे पैशाला काय किंमत” आणखी एका युजरने लिहिलेय, “बाई रॉक आम्ही सर्व शॉक” एक युजर लिहितो, “बँकेत जा” अनेक युजर्सनी बँकेत जाऊन नोटा बदलून घेण्याचा सल्ला दिला आहे.
या आज्जीचे नाव लक्ष्मीबाई आहे. तिच्या बायोमध्ये तिचे वय १०५ वर्ष लिहिलेले आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात.