Viral Video : सध्या लग्नसमारंभाला सुरूवात झाली आहे. दररोज कुठे ना कुठे लग्नाची वरात दिसते. लग्नाच्या वरातील तुम्ही कधी डान्स केला आहे का? लग्नाच्या वरातील डान्स करण्याची एक वेगळीच मजा असते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा वरातीत तुफान डान्स करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (video in wedding Old Man Dances at Varaat Wedding While Sitting on Young Man’s Shoulders)
आजोबांनी केला लग्नाच्या वरातीत भन्नाट डान्स (Dance Video Viral)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक लग्नाची वरात दिसेल. या वरातील लहान मुले, तरुण मंडळी, बायका पुरुष सर्व जण उत्साहाने डान्स करत आहे पण सर्वांचे लक्ष एका आजोबांनी वेधले. हे आजोबा चक्क एका तरुणाच्या खांद्यावर बसून डान्स करत आहे. आजोबांचा उत्साह पाहून तुम्हीही थक्क व्हाल. इतर तरुण मंडळी आजोबांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. लग्नाच्या वरातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
abhay_kalsule_photography या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजोबा जोमात वरात कोमात”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजोबांनी लाडका भाऊ फॉर्म भरला वाटतं” तर एका युजरने लिहिलेय, “लोकेशन लिगायत बोर्डिंग बार्शी” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजोबा आता इतके नाचत आहे तर लहानपणी तर आजोबांची दहशत काही वेगळीच होती” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट्स करत आजोबांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काहींनी हसण्याचे इमोजी तर काहींनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
यापूर्वी सुद्धा वृद्धांचे डान्स करतानाचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या एका आजोबांचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. हे आजोबा “मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन” या गाण्यावर डान्स करताना दिसले होते. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून सर्वजण थक्क झाले होते. नेटकऱ्यांनी त्यांच्या ऊर्जेचे कौतुक केले होते. त्या आजोबांचे नाव विजय खरोटे आहे आणि ते एक व्हिडीओ क्रिएटर आहेत. त्यांना इन्स्टाग्रामवर मोठ्या संख्येने लोक फॉलो करतात.
/