Anand Mahindra Viral Tweet Video: आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात. अनेकांच्या व्हायरल पोस्ट महिंद्रा स्वतः आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर करून त्यावर तितक्याच मजेशीर कमेंट करत असतात. त्यांनी शेअर केलेल्या ट्वीट वर नेटकरीही अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. आता सुद्धा आनंद महिंद्रा यांनी अशीच एक मजेशीर पोस्ट केली आहे. यामध्ये एका तरुणाने जगातील सर्वात स्वस्त ट्रेडमिल बनवली असल्याचे महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये म्हंटले आहे. नेमका काय आहे का व्हिडीओ व त्यावर लोकांनी कसे प्रतिसाद दिले आहेत जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक तरुण भांडी घासायचे लिक्विड जमिनीवर ओतताना दिसून येत आहे. किचनच्या ओट्याच्या बाजूला उभं राहून हा पठ्ठ्या मग दोन हातांनी ओट्याचा काठ धरतो आणि त्या लिक्विडवरून धावायला सुरुवात करतो. अर्थात त्या लिक्विडच्या फेसामुळे तो घसरतो आणि ज्याप्रमाणे ट्रेड मिलवर धावताना आपला वेग सेट होतो तसेच हा तरुण पळू लागतो. आनंद महिंद्रा यांनाही या व्हिडिओचं फार अप्रूप वाटल्याने त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आणि त्यावर म्हंटल की या माणसाला यंदाचा सर्वात इन्व्होटीव्ह अवॉर्ड द्यायला हवा.

आनंद महिंद्रा ट्वीट

हे ही वाचा<< “मी रात्री असाच नाचणार कारण.. ” आनंद महिंद्रा यांनी Video ट्वीट करून फॉलोवर्सना केलं खुश

दरम्यान, हा व्हिडीओ शेअर केल्यापासून यावर ९ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अभिनेत्री अमृता रावसह अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी तर हे इन्व्होटीव्ह नाही खतरनाक आहे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video anand mahindra viral tweet cheapest treadmill says most innovative awards of year 2023 goes to this man svs