Angry Crocodile Video: मगरीच्या नावाने माणूसच काय तर भलेभले प्राणी सुद्धा घाबरून जातात. आपण आजवर अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मगरीला एका झटक्या बलाढ्य प्राण्यांचा फडशा पाडताना पाहिले आहे. मात्र म्हणतात ना तुम्ही प्रेमाने अगदी कोणालाही जिंकू शकता. तसाच काहीसा प्रकार आता सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ट्विटरवर एका महिलेचा मगरीसह व्हिडीओ पाहून अक्षरशः ही बाई जादूगरीण आहे की काय असा प्रश्न आपल्यालाही पडू शकतो. या व्हिडिओमध्ये बाईच्या दिशेने एक मगर धावत येते पण या मॅडम असं काही करतात की मगर अगदी एखाद्या लहान बाळासारखी शांत होऊन जाते. नेमकं असं घडतं तरी काय, चला पाहूया…

आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की मगर जेव्हा बाईच्या दिशेने धावत येते तेव्हा अगदी जबडा उघडून रागाच्या आवेशात येताना दिसत आहे. पण ही महिला काही घाबरत नाही उलट एखाद्या लहान कुत्र्याच्या पिल्लाला आपण गोंजारतो तशी ती मगरीशी वागू लागते. प्रेमाने डोक्यावरून हात काय फिरवते, काय झालं विचारते, शांत बसायला सांगते. तिचा हा आत्मविश्वास बघून तिचं कौतुक करावं की वेड्यात काढावं असा विचार आपल्या डोक्यात येऊन जातो पण तितक्यात मगर अशी काही शांत बसते की तुम्हाला डोळ्यावर विश्वासच बसणार नाही.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

Video: मगर भडकली पण प्रेम…

हे ही वाचा<< १० सेकंदात कळेल खरा ‘वाघ’ कोण! वाघ व मोराची थरारक झुंज पाहून एक कोटी लोकांनी घेतला ‘हा’ धडा

दरम्यान या व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून साहजिकच यावर लाखो व्ह्यूज आले आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा प्रेमाची शक्ती उचलून धरली आहे. तर काहींनी मात्र असा जीवाशी खेळ करण्याची काहीच गरज नाही असेही म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तर या बाईला सुपर वुमन म्हंटल आहे. काहीही असलं तरी तुम्ही काही असे प्रयोग करून पाहायला जाऊ नका.

Story img Loader