Lady Beats Police On road: असं म्हणतात बाईच बाईची शत्रू ठरते याचेच उदाहरण दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘बाईपणाच्या’ नावावर भाईपणा करणाऱ्या एका महिलेचा हा व्हिडीओ स्त्री हक्कासाठी लढणाऱ्या महिलांचे नाव धुळीला मिळवण्याचे काम करत आहे. स्त्री ही पुरुषांइतकीच सक्षम आहे असं म्हणताना समाजातील काही महिला या आपण स्त्री आहोत म्हणून पुरुषांवर अन्याय करताना दिसतात हे सुद्धा टाळता येणार नाही. विशेषतः वर्दीतील अधिकाऱ्यांसमोर स्वतःची चूक असताना फक्त ‘स्त्री’ कार्ड खेळून सूट मिळवू पाहणाऱ्यांचे अनेक प्रकार नेहमी व्हायरल होत असतात. असाच काहीसा आजचा व्हिडीओ सुद्धा आहे. मात्र यामध्ये संबंधित महिलेने चक्क पोलिसांच्या कानाखाली मारून मर्यादा ओलांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

@ghar_kalesh अशा ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. सदर प्रकार दिल्लीतील असल्याचे समजतेय. यामध्ये महिला ट्रॅफिक पोलिसांची हुज्जत घालताना पाहायला मिळतेय. ती थेट पोलिस अधिकाऱ्याच्या कानाखाली मारते आणि मग थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर उलट आरोप करायला लागते. या महिलेची भाषा ऐकून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. वर्दीतील अधिकाऱ्यावर हल्ला करणं हा गुन्हा आहे, या महिलेला कठोर शिक्षा व्हायला हवी अशी मागणीही अनेक जण करत आहेत.

Video: भररस्त्यात वर्दीतील पोलिसांना कानाखाली मारलं

हे ही वाचा<< छातीवर पाय देऊन उभे राहिले पोलीस; साक्षी हत्याकांडाशी संबंधित ‘त्या’ व्हिडिओवर नेटकरी भडकले, पण खरंतर…

दरम्यान, अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वी आयपीएलच्या सामन्यांच्या वेळी मे महिन्यात एका महिलेने स्टेडियममध्ये पोळी अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली होती व सर्वांसमोर कानशिलात लगावली होती. भारतात अशाप्रकारे सरकारी कर्मचारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांवर हात उचलणे हा दंडनीय गुन्हा आहे व यासाठी संबंधित आरोपीला दंड किंवा जेल सुद्धा होऊ शकते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video angry indian aunty beats police slaps hard women language made netizens pissed off people ask to arrest lady svs