Viral Video Today: जंगलाचा राजा कोण? सिंह बरोबर.. आता सिंहाला कोणी तगडी टक्कर देऊ शकत असेल तर ते म्हणजे सिंहीण. म्हणूनच बहुतांश वेळा सिन्हाहून अधिक रुबाबात सिंहीणी जंगलात वावरताना आढळतात. अन्य प्राण्यांवर हल्ले करतानाही सिंहीणी फार घाबरत नाहीत पण काही वेळा म्हणतात ना शेरास सव्वा शेअर मिळतोच..तसेच आता या व्हारल व्हिडिओमधील सिंहिणीला धूळ चारण्यासाठी झेब्रा भन्नाट शक्कल लढवताना दिसत आहे. अंगावर काटा आणेल असा हा जंगलातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. जंगलात काही वेळा प्राणी माणसांच्या विचारापलीकडे जाईल अशी भांडणे करतात असाच काहीसा प्रकार आज आपण व्हायरल व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण बघू शकता की एक सिंहीण झेब्र्याची मान आपल्या तीक्ष्ण दातांमध्ये पकडून त्याला फरफटत नेत आहे, अशातच एक दुसरा झेब्रा तिथे येतो आणि ते दोघे मिळून सिंहिणीला अक्षरशः वेड्यात काढतात. हे दोन झेब्रा फक्त स्वतःची सुटका करत नाहीत तर त्यासाठी ज्या हिमतीने जंगलाच्या राणीला मात देतात ते पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. फार उत्सुकता न ताणता चला आता आपणही हा व्हिडीओ पाहुयात..

जंगलाची राणी फेल, झेब्र्याची हुशारी पाहा

हे ही वाचा<< बायकोचा दबदबा! सिंहिण इतकी भडकली..भररस्त्यात केला राडा; सिंहाची ‘ती’ एक कृती देते जीवनाचा धडा

दरम्यान, सिंहीणी सहसा कळपात फिरतात, हल्ला करतानाही सिंह किंवा अन्य सिंहीणी त्यांच्या आजूबाजूला असतात. यापूर्वी एकदा एक दोन नव्हे तर चक्क १४ सिंहिणीनी हत्तीवर हल्ला चढवला होता. यावेळी गजराजांनी मोठ्या हुशारीने सिंहिणीना हरवले होते. यापूर्वी एका झेब्र्याने सिंहाला सुद्धा मात दिली होती. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला सुद्धा लाखो व्ह्यूज आहेत. नेटकऱ्यांना प्राण्यांची लढाई व त्यांची हुशारी पाहणे आवडते हे या व्ह्यूज व कमेंट्समधून दिसून येते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video animal fight lioness running with zebra stuck in teeth shocking incident turns table this viral clip will bring goosebumps svs
Show comments