सर्वात पहिल्यांदा पृथ्वी कोणी बघितली? सुरुवातीला ती कशी दिसत होती? असे अनेक प्रश्न कधी ना कधी आपल्या मनात येतात. शिवाय अनेकांना तर अशा रहस्यांबाबत जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. अशातच आता एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये पृथ्वीचा पृष्ठभाग १० कोटी वर्षांपासून कसा बदलत आला याबाबतचीदृश्य दाखवण्यात आली आहे. त्यामध्ये पृथ्वी पूर्वी एक महाकाय खंड असायचा जो तुटत तुटत वेगळा होत गेल्याचं दाखवण्यात आलं आहे. तसंच टेक्टोनिक प्लेट्स कशा हलल्या? खंड कसे तयार झाले? हे व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. या २१ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये १० कोटी वर्षांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हिडिओमध्ये टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे पृथ्वीचा वरचा थर कसा बदलत गेला आणि पर्वतांची कसे निर्माण झाले? दऱ्या खोरे कसे तयार झाले आणि समुद्रांचे विभाजन कसं झालं हे दाखवताना, माती आणि प्लेट सरकल्याने सर्व बदल घडल्याचंही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसंत इरोजनमुळेही या हे सर्व घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा- ‘ही’ भारतीय रेल्वे थेट सिंगापूरला जाते! प्रवासाचा मार्ग जाणून व्हाल थक्क
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, टेक्टोनिक प्लेट्सची हालचाल कशी होते, पृथ्वीचा वरचा थर म्हणजेच क्रस्ट एकमेकांपासून कसे वेगळे होत आहेत. शिवाय या प्लेट्सची एकमेकांशी टक्कर होत आहे. जेव्हा या प्लेट्स हलतात तेव्हा त्याचा आवरणावर परिणाम होतो. ज्यामुळे सबडक्शन झोन तयार होतात, ज्यामुळे ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि पृथ्वीवर भूकंपही होतो.
मात्र, खंड केवळ याच कारणाने बनत नाहीत तर पावसाच्या उपस्थितीमुळे पृष्ठभाग अधिक मजबूत होतो. हवामानात बदल होतात. हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सतत बदलते, वातावरणातील बदल अशी अनेक कारणे पृथ्वीच्या जडणघडणीला कारणीभूत असतात. सिडनी विद्यापीठातील भूविज्ञान विषयातील वरिष्ठ प्राध्यापक ट्रिस्टन सॅलेस यांनी सांगितले की, अनेक दशकांपासून खंडांच्या हालचालींचा अतिशय तपशीलवार अभ्यास केला जात असून त्यांची निर्मिती आणि बिघडण्याची प्रक्रिया समजून घेतली जात आहे.
या व्हिडिओ मॉडेलचा अहवाल नुकताच सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. यामध्ये २० कोटी वर्षांपूर्वी Pangea (Pangea) तुटण्यास कशी सुरुवात होते हे सांगितले आहे. १० कोटी वर्षांची परिस्थिती येताच ते तुटायला सुरूवात होते. आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेा विभक्त होण्याची कहाणी या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसंच उत्तर गोलार्धातील खंड कसे वेगळे झाले आणि नवीन कसे बनले हे देखील दिसत आहे.
फ्रान्समधील ग्रेनोबल येथील इन्स्टिट्यूट ऑफ अर्थ सायन्सेसचे भूवैज्ञानिक लॉरेंट हुसन यांनी सांगितले की, आम्ही पहिल्यांदा पृथ्वीच्या जवळच्या इतिहासाचे मॉडेल तयार केले. त्यानंतर त्याची गतीशीलता समजून घेऊन हे मॉडेल तयार केले आहे. या वेळी जुने मॉडेल, कागदपत्रे आणि इतर अनेक वैज्ञानिक अहवालांचा अभ्यास केला आहे. हे ३ ते ६ कोटी वर्षांपूर्वी भारत आणि चीनच्या सीमेवर तयार झालेल्या हिमालय आणि तिबेटच्या पठारांची निर्मिती देखील यात दाखवली आहे.