Pet Dog Attack In Lift : गेल्या काही दिवसात दिल्ली-एनसीआरमध्ये कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी गाझियाबादमधील राजनगर एक्स्टेंशनच्या एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये एका लहान मुलाला पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याची घटना उघडकीस आली. आता असाच एक प्रकार नोएडामध्येही समोर आला आहे. नोएडातील सेक्टर ७५ च्या एपेक्स एथेना सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. इथे एक व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्यासह लिफ्टमधून जात होता. त्यादरम्यान लिफ्टमध्ये उपस्थित असलेल्या आणखी एका तरुणावर कुत्र्याने हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याचा व्हिडीओ सध्या तेजीने व्हायरल होऊ लागलाय.

नोएडातील सेक्टर ११३ पोलीस स्टेशन हद्दीतील सेक्टर ७५ मधील एपेक्स एथेना सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली आहे. एक तरुण कुत्र्याला सोबत लिफ्टमधून घेऊन जातो. बाजुलाच एक मुलगा लिफ्टचे दाराजवळ उभा असलेला दिसत आहे. लिफ्टचे दार उघडल्यावर कुत्रा बाहेर पडण्यासाठी पुढे येतो आणि बाजुला उभ्या असलेल्या मुलाला चावा घेतो. दरवाजा पूर्ण उघडताच कुत्र्याचा मालक बाहेर पडतो.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Man Saves Dog From Bear With Life-Risking
अस्वलाचा कुत्र्यावर हल्ला, जबड्यात पकडली त्याची मान; जीव वाचवण्यासाठी धाडसी माणुस थेट अस्लवाशी भिडला, पहा थरारक Video
Hanumangargh Betting On Dog Fight News
Dog Fight : धक्कादायक! विदेशी कुत्र्यांवर खेळला जात होता सट्टा; ८१ जणांना अटक; १९ कुत्र्यांसह १५ वाहने जप्त
pimpri teacher beaten up with hammer
पिंपरी : लिफ्टमध्ये घुसून शिक्षिकेला हातोडीने मारहाण
viral video Dog tore 500 rupees notes
कुत्र्याने ५०० च्या नोटांचे केले तुकडे, VIDEO होतोय व्हायरल
Dog Killed Crocodile Animal Video Viral Dog Fight With Crocodile Who Will Win Watch This Video Till End
VIDEO: “हिम्मतीपुढं सगळं शक्य” मगरीनं कुत्र्याला जबड्यात पकडला मात्र ५ सेकंदात डाव पलटला; लढाईचा शेवट पाहून तुम्हीही व्हाल हैराण
Dogs suddenly attack a toddler playing on the Slider grab his leg in their jaws Heartbreaking video Viral
घसरगुंडीवर खेळणाऱ्या चिमुकल्यावर अचानक कुत्र्यांनी केला हल्ला, जबड्यात पकडला पाय अन्… काळजाचा थरकाप उडवणारा Video!

आणखी वाचा : कुत्रा विरूद्ध पाणकुत्रा, पाहा कुणी मारली बाजी, हा गोंडस VIRAL VIDEO पाहून मन प्रसन्न होईल

गाझियाबादमध्ये घडलेल्या घटनेप्रमाणेच या घटनेत सुदधा कुत्र्याच्या मालकाने कुत्रा चावल्यानंतर मुलाच्या मदतीसाठी थांबला नाही. लिफ्टचा दरवाजा उघडताच तो तिथून पळून गेला आणि मुलग वेदनेने तिथेच कळवळत राहिला. हा व्हिडीओ तसा १५-२० दिवस जुना आहे. कुत्र्याने हल्ला केलेला तरुण हा जवळच्या मेडिकल स्टोअरचा डिलिव्हरी बॉय असून तो सोसायटीत औषधे देण्यासाठी आला होता. कुत्र्याच्या मालकाने प्रकरणाचे गांभीर्य समजून डिलिव्हरी बॉयशी बोलून प्रकरण मिटवले आणि उपचारासाठी पैसेही दिल्याचे सोसायटीतील लोकांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा : एक मगर रस्त्यावर साचलेल्या पाण्यात धावताना दिसली, जाणून घ्या VIRAL VIDEO मागचं सत्य

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : स्मार्टनेसच्या बाबतीत कुत्रेही काही कमी नाहीत, पाहा पायऱ्यांवरून कसा भरभर उतरला!

कुत्रा चावल्यानंतर या मालकाला त्या मुलाची साधी चौकशी सुद्धा करावीशी वाटली नाही, हे पाहून नेटकरी मात्र पुरते संतापले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक कुत्र्याच्या मालकावर जोरदार टिका करताना दिसत आहेत. उच्चभ्रू सोसायटीत अनेकांना वेगवेगळ्या जातींची कुत्रे पाळण्याचा छंद असतो. त्यात विदेशी जातींची कुत्रे देखील असतात. कुत्री सांभाळत असताना किंवा पाळत असताना शेजारच्यांना किंवा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं कायम सांगण्यात येतं. मात्र या नियमाचं पालक होताना दिसत नाही. संध्याकाळी अनेक लोक आपले कुत्रे बाहेर फिरायला घेऊन जातात. मात्र यावेळी नागरिकांना या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. आतापर्यंत अनेक शहरात अशा कुत्रा चावल्याच्या घटना घडल्या आहेत. कुत्र्यांना नीट ठेवणं ही मालकाची जबाबदारी असते त्यामुळे अनेकदा अशा प्रकरणात मालकांवर गुन्हा दाखल केला जातो.

Story img Loader