राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार स्वीकारणे हा कोणत्याही भारतीयासाठी अभिनानाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा क्षणच असतो, मत ते भारतीय अगदी त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज असले तरी ते भारावून जातात. सामान्यपणे राष्ट्रपतींशी हस्तांदोलन करुन पुरस्कार स्वीकारला जातो. मात्र तृतीयपंथी म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या माता बी मनजम्मा या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार घेण्यास गेल्या तेव्हा त्यांनी असं काही केलं की पंतप्रधानांपासून ते सभागृहातील मान्यवरांनी टाळ्या वाजवून त्यांच्या कृतीचं कौतुक केलं.
यावेळी पद्म पुरस्कार प्राप्त करणार्यांपैकी एक कर्नाटकची तृतीयपंथी कलाकार माता बी मनजम्मा जोगती देखील आहे. त्यांनी पद्मश्री प्राप्त करताना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना त्यांच्या स्वत: च्या शैलीत दृष्ट काढली. पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या डोक्यावर आपल्या साडीचा पदर फिरवून, शिड्यांवर बोटं मोडून त्यांनी राष्ट्रपतींची नजर काढली. तेथे उपस्थित लोकांनी त्यांचे हसतमुखाने आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्यांचे हात जोडून स्वागत केले.
( हे ही वाचा: वनप्लस फोन पुन्हा फूटला ! युजरच्या मांडीला झाली जबर जखम; जाणून घ्या बॅटरीचा स्फोट का होतो? )
राष्ट्रपतींनाही कदाचित पहिल्यांदाच मिळालेलं हे अनोखं अभिवादन अगदी हसत हसत स्वीकारलं.हा सारा प्रकार पाहून सभागृहातील सर्वांनीच माता बी मनजम्मा जोगती यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या.टाळ्यांच्या कडकडाटामध्येच माता बी मनजम्मा जोगती यांनी पुरस्कार स्वीकारला.हे दृष्य खरोखरच भारावून टाकणारं होतं, म्हणूनच ते व्हायरल होत आहे.
( हे ही वाचा: विराट कोहली, रवी शास्त्री आणि भरत अरुण यांचा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद; व्हिडीओ व्हायरल )
माता बी मनजम्मा जोगती या मूळ नर्तिका आहेत. ‘कर्नाटक जनपद अकादमी’च्या अध्यक्षपदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या तृतीयपंथी आहे. लोकांच्या द्वेषाला सामोरे जाण्यापासून ते नंतर अनेक संघर्षांनंतर या उंचीपर्यंतचा प्रवास त्यांनी प्रवास पूर्ण केला आहे. ते मानतात की माणूस हा माणूस आहे, कोणीही कमी किंवा जास्त माणूस नाही. कलेबाबतही त्यांचा असाच विचार आहे.