गेल्या अनेक दिवसांपासून अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट देशभर धुमाकूळ घालत आहे. अजूनही या चित्रपटातील डायलॉग आणि डान्स स्टेप्सची सगळीकडे चर्चा आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जेव्हापासून या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन आले आहे, तेव्हापासून अशा व्हिडीओंची संख्याही वाढली आहे. चित्रपटातील ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ या एका गाण्याच्या डान्स स्टेप्सवर सर्वाधिक व्हिडीओ बनवले जात आहेत.
सध्या या गाण्याशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही म्हणू शकाल की या गाण्याची क्रेझ आता चिमुकल्यांमध्येही दिसून येत आहे. एका चिमुकल्याचा श्रीवल्ली गाण्यावरचा हुक स्टेप करतानाचा एक व्हिडीओ भन्नाट व्हायरल झाला आहे.
(हे ही वाचा: Viral Photo: ओळखा पाहू; हा फोटो भारतातील कोणत्या राज्यातील आहे?)
‘प्रफुल्ल राजे’ या फेसबुक युजरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा नाचताना दिसत आहे. टीव्हीवर श्रीवल्ली हे गाणे वाजत असताना, लहान मुलगा अल्लू अर्जुनच्या हुक स्टेपची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या या परफेक्ट स्टेप्स पाहून तुम्हीही त्याचं आवर्जून कौतुक कराल.
(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोत लपलेला हिम बिबट्या तुम्ही शोधू शकता का? फोटोग्राफरच होतय कौतुक)
(हे ही वाचा: ‘या’ देसी जुगाडासमोर मोठी मशीनही फेल; हा viral video एकदा बघाच!)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ अनेक हजार लोकांनी बघितला आहे. ७४० लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत तर २१ हजार लोकांनी व्हिडीओला शेअर केलं आहे. लोकांना लहान मुलाचा हा व्हिडीओ खूपच गोंडस वाटला. अनेकांनी कमेंट्स विभागात फक्त हार्ट इमोजीसह लहान मुलावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. श्रीवल्ली देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केली होती आणि गीते चंद्रबोस यांची आहेत. या गाण्याला यूट्यूबवर १५९ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.