Viral Video Today: अलीकडे बहुतांश घरांमध्ये आई- वडील दोन्ही जॉब करत असल्याने बाळांना सांभाळण्यासाठी आया- मावशी यांची मागणी वाढली आहे. अनेक गरजू महिलांसाठी यामुळे कामाची संधी व आई वडिलांना बाळाची सोय करून देणारा सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे. पण यापूर्वी अनेकदा या बेबी सीटिंग करणाऱ्या महिलांनी केलेले काही विचित्र प्रकार व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे साहजिकच अनेक जोडप्यांची चिंता वाढू शकते. आता सुद्धा एका इंस्टाग्राम अकाउंटवर एका आईने आपल्या बाळाच्या बाबत बेबी सीटरने केलेला धक्कादायक प्रकार शेअर केला आहे. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला होता जो पाहून आपल्यालाही धक्का बसल्याचे सांगत या महिलेने हा अनुभव शेअर केला आहे. नेमका हा व्हिडीओ व प्रकरण काय आहे समजून घेऊया…

@themommysworld या अकाउंटवर मालिनी नामक महिलेने या घटनेबाबत सांगितले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिल्यानुसार, “बेबी सीटरला बाळाला नाचणी सत्व भरण्यास सांगितले होते. विचारणा केली तेव्हा सदर महिलेने बाळ पोटभर खाऊन झोपल्याचे सांगितले. मला खूप काम होते आणि माझा पती (फ्रॅंक) सुद्धा घरी नव्हता, म्हणून मी पुन्हा कामामध्ये गुंतून गेले. नंतर का माहित नाही पण काही कारणाने मला कॅमेराचे फुटेज बघावेसे वाटले.”

girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

“मला दुपारी १ वाजताच फुटेज तपासताना असे दिसून आले की तिने बाळाला भरवताना स्वच्छतेची अजिबात काळजी घेतली नव्हती. बाळाला जबरदस्ती बोट तोंडात घालून ती भरवत होती, मध्ये मध्ये तर ती स्वतःच बाळाचे खाणे खात होती. याबाबत दुसऱ्याच दिवशी बेबी सीटरला विचारले असता तिने थेट घर व काम सोडून जात असल्याचे सांगितले, एजन्सीला याबाबत कळवले आहे आता ते काही कारवाई करणार का हे पाहावे लागणार आहे.”

Video: बेबी सीटरचा बाळाबरोबर व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत या आईच्या काळजीचे समर्थन केले आहे. तर काहींनी मात्र कमेंट करत, “तुमचं बाळ त्या महिलेबरोबर खूप शांत व कम्फर्टबेल वाटत आहे त्यामुळे ती जबरदस्ती करतेय असं दिसत नाही. शिवाय बहुतांश भारतीय घरांमध्ये बाळाला हातानेच भरवले जाते. तुम्हाला यात प्रेम दिसत नाही हे दुःखद आहे पण एखाद्याच्या आईचा असा सोशल मीडियावर अपमान करणे लज्जास्पद आहे.

Story img Loader