Viral Video Today: सोशल मीडियावर व्हायरल होणारे ट्रेंड काही वेळेस आपल्याला अगदी गाल दुखेपर्यंत हसवतात तर काही वेळा गालावर क्षणात अश्रू ओघळतील असेही व्हिडीओ पाहायला मिळतात. यावेळी व्हायरल होणारा एक व्हिडीओ सुद्धा असाच काहीसा आहे. आधी तुम्हाला हा व्हिडीओ पाहून गंमत वाटेल पण यातून एकाअर्थी वर्षानुवर्षे चालत आलेले कित्येक गैरसमज पुसून निघत आहेत. आपल्याकडे पितृसत्ताक संस्कृती असल्याने कितीतरी वर्ष आपल्या घरातील पुरुष मंडळींसमोर स्त्रियांना उघडपणे बोलायलाही परवानगी नव्हती मात्र या बुरसटलेल्या विचारांना एकार्थी छेद देणारा हा व्हिडीओ आहे. रूपल सिंग चौहान या इंस्टाग्राम इंफ्ल्यूएंसरने पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल २८ लाखाहून अधिक व्ह्यूज व लाखो लाईक्स मिळाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मागील काही दिवसात आपणही इंस्टाग्रामवर हा ट्रेंड पहिला असेल ज्यात समोर कुणीतरी नाचत असतं व ती व्यक्ती आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला व्हिडीओ शूट करण्यासाठी सांगते. यावेळी कॅमेरा उलट धरलेला असतो म्हणजेच फ्रंट कॅमेऱ्याने शूट करत आहे असं दाखवलं जातं मात्र मुळात बॅक कॅमेरा सुरु असतो, यामुळे समोरची व्यक्ती डान्स करत असताना कॅमेऱ्याच्या मागे उभ्या असणाऱ्या व्यक्तीचे हावभाव टिपले जातात.

रुपलने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तिने आपल्या सासरेबुवांना आपला डान्स रेकॉर्ड करायला सांगितला आहे. सुनेच्या भन्नाट डान्स मूव्ह्ज बघताना सासऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी पाहण्यासारखे आहेत.

हे ही वाचा >> Video: गर्दीच्या ट्रेनमध्ये ‘ती’ एकटी चढताच पुरुषांनी तोंडं लपवली; प्रत्येकासमोर जाऊन म्हणाली “तुला.. “

अन सुनेला नाचताना बघून सासरेबुवा थक्क…

हे ही वाचा >> इट्स बिजनेस! मुंबईकराने उभारली अंत्यसंस्कार कंपनी; तिरडी ते मृत्युदाखला पॅकेजच्या सेवा व किंमत ऐकलीत का?

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, अनेकांनी या सून- सासऱ्याच्या गोड नात्याचे कौतुक केले आहे. अशी कूल फॅमिली असेल तर सर्वच मुली आनंदात राहतील अशाही कमेंट्स या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.