Bangladeshi People Attacked Police In Mathura Fact Check: लाइटहाऊस जर्नलिझमला पोलिस अधिकारी आणि नागरिक यांच्यातील संघर्षाचे चित्रण करणारा व्हिडीओ ऑनलाईन व्हायरल होत असल्याचे लक्षात आले . हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील मथुरा येथील असल्याचा दावा करण्यात आला होता, जिथे पोलिस ओळख पडताळणीसाठी आले होते. व्हिडीओमध्ये कथितरित्या बांगलादेशातील रोहिंग्या समुदायाचे लोक पोलिस अधिकाऱ्यांना त्रास देताना दिसत आहेत असे सांगण्यात आलेय. आमच्या तपासात या व्हिडीओतील घटना खरी असल्याचे जरी लक्षात आले असले तरी एक बाब मात्र सपशेल चुकली आहे, ती काय, हे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Arun Singh ने व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडीओमधील मुख्य फ्रेम्स मिळवून आणि नंतर त्यावर रिव्हर्स इमेज सर्च चालवून आमचा तपास सुरू केला. आम्हाला The Pulse NE च्या YouTube चॅनेलवर एक व्हिडीओ सापडला.

व्हिडीओचे शीर्षक होते: Assam Minister Raises Concern Over Rising Incidents post election (आसामच्या मंत्र्यांनी निवडणुकीनंतर वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली) त्यामुळे हा व्हिडीओ आसामचा असल्याचे आमच्या लक्षात आले. रिव्हर्स इमेज सर्च दरम्यान, आम्हाला आसामचे मंत्री पियुष हजारिका यांची पोस्ट सापडली, ज्यात ही घटना आसामची असण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाले.

आम्हाला पोस्टवर मथुरा येथील पोलिसांचे उत्तर देखील सापडले.

हा व्हिडीओ मथुरेतील नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर आम्हाला २८ जून २०१४ रोजी इंडिया टुडे NE वर अपलोड केलेली एक बातमी दिसली.

https://www.indiatodayne.in/assam/video/assam-pijush-hazarika-slams-certain-people-for-attacking-cops-shares-video-1038016-2024-06-28

रिपोर्ट मध्ये नमूद केले आहे की: आसामचे मंत्री पियुष हजारिका यांनी X वर पोस्ट केले असून त्यांनी धिंग, आसाम येथील पोलिस कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. २८ जून रोजी, हजारिका यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असहिष्णुतेने वागवल्याचा आरोप संबंधित समुदायावर केला.

या रिपोर्ट मध्ये पुढे नमूद करण्यात आले आहे की, “आसाममधील धिंग येथे काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना होती. एका विशिष्ट समुदायातील असहिष्णू लोक ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर हल्लेखोरांप्रमाणे हल्ले करत आहेत,” असे हजारिका यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. आसामच्या नागाव जिल्ह्यात असलेल्या धिंगमध्ये जमावाने पोलिस अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ सुद्धा यात जोडण्यात आला आहे.

हे ही वाचा<< सोनिया गांधी यांच्या हातात सिगारेट पाहून नेटकऱ्यांनी तुफान शेअर केला तो फोटो! पण ‘या’ लहानश्या गोष्टीमुळे सिद्ध झालं खरं

यापूर्वी २७ जून रोजी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लोकांचा एक विशिष्ट वर्ग राज्यात अशांतता निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. अशा हल्लेखोरांना हाताळताना कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते.

निष्कर्ष: ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याचा आसाममधील जुना व्हिडिओ मथुरा, यूपी मधील असल्याचे सांगून व्हायरल झाला आहे. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.