Viral Video : सध्या उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. लोक फिरण्यासाठी थंड ठिकाण शोधताहेत. पुणे मुंबईजवळ असे अनेक ठिकाणे आहेत जिथे पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसून येते. तुम्ही सुद्धा बाहेर फिरायला जायचा विचार करत असाल तर आज आपण एका हटके ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत. हे ठिकाण पुण्याजवळून ८० किमीवर आणि मुंबईजवळून १०० किमीवर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या या ठिकाणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी या ठिकाणाविषयी सांगताना दिसत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ठिकाण नेमके कुठे आहे, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या व्हिडीओमध्ये तुम्हाला सुंदर व्हॅली दिसेल. पुढे तुम्हाला तलावासारखा काही भाग दिसेल. मोठ्या मोठ्या खडकावर आदळणारा सुंदर धबधबा दिसेल. हा व्हॅलीचा परिसर अतिशय सुंदर व नयनरम्य आहे. काही लोक या व्हॅलीमध्ये पोहताना सुद्धा दिसत आहे. एक तरुणी या व्हॅलीजवळ मॅगी बनवताना दिसत आहे. हा निसर्गरम्य परिसर पाहून कोणीही थक्क होईल. कोणालाही या ठिकाणी एकदा भेट द्यावीशी वाटेल. व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यापासून ८० किमी आणि मुंबईहून १०० किमी अंतरावर उन्हाळ्यात या ठिकाणी नक्की जा.”

पाहा व्हायरल व्हिडीओ

varshaomkarvlogs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कधी जाणार. एकोल व्हॅलीमधील भोरंबी धबधब्याच्या तलावाकडे जाणारा ट्रेक, ज्याला लोटस वॉटरफॉल म्हणूनही ओळखले जाते, खडकाळ नदीच्या पात्रातून एक रोमांचक आणि साहसी प्रवास देते. या वाटेवरून एका मोठ्या तलावाचे चित्तथरारक दृश्य दिसते, जिथून धबधबा तीन थरांमध्ये एकोल व्हॅलीमध्ये येतो.
या ट्रेकमध्ये चढउतार आणि शेवटच्या ठिकाणी खोल तलाव असल्याने मोठी आव्हाने आहेत. पोहता येत नसलेल्यांनी सुरक्षिततेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आणि लाईफ जॅकेटशिवाय तलावात प्रवेश करणे टाळणे अत्यंत महत्वाचे आहे. अनुभवी पोहणाऱ्यांनीही सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण खोल पाण्यात धोका निर्माण होऊ शकतो. लाईफ जॅकेट घालणे सर्व ट्रेकर्सना सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर प्रदान करते.”

लोटस वॉटरफॉल ट्रेकची माहिती
सहनशक्ती पातळी: उच्च
ट्रेक अंतर: ८ किमी
स्थान: एकोले व्हॅली”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती किमी ट्रेकिंग आहे?” तर एका युजरने लिहिलेय, “मस्त लोकेशन आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “एकोली व्हॅली लोटस वॉटरफॉल” एक युजर विचारतो, “उन्हाळ्यामध्ये पाणी असतं का?” तर एक युजर लिहितो, “काळजी घ्यावी लागते”