Independence Day 2023: आज भारतात मोठ्या जल्लोषात ७६ वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा होत आहे. पण स्वातंत्र्य म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का? किंबहुना तुमच्या लेखी स्वातंत्र्य कसं दिसतं, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पण तत्पूर्वी एका भारतीय वनाधिकाऱ्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्वातंत्र्याची व्याख्या एका खास व्हिडीओ स्वरूपात सादर केली आहे. परवीन कासवान यांनी ट्विटर (X) वर पृथ्वीवरील सर्वात महाकाय पक्ष्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ बघून तुम्हीही थक्क व्हाल.

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पक्ष्याचे नाव हिमालयन ग्रिफॉन असे आहे. हिमालयात उंचावर या पद्धतीचे गिधाड आढळत असून हे भारतातील किंवा आशियातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठे पक्षी आहेत. यापूर्वी जानेवारीमध्ये कानपूरच्या कर्नलगंज येथील ईदगाह स्मशानभूमीत हिमालयीन ग्रिफॉन गिधाड आढळून आले होते. स्थानिकांनी या पक्ष्याला पकडून नंतर उत्तर प्रदेश वनविभागाकडे सोपवलं होतं. कासवान यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपण या गिधाडाला पंख पसरून उडताना दिसत आहे. हे दृश्य पाहून नेटकरी सुद्धा अंगावर शहारा आल्याचे म्हणत आहेत. हा भारावून टाकणारा क्षण आपणही पाहा.

Video: पृथ्वीवरील सर्वात मोठा पक्षी जेव्हा भरारी घेतो

हे ही वाचा<< ‘गदर २’ सुरु असताना ‘मोदी जिंदाबाद’, ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणांमुळे तुफान हाणामारी, नेमकं घडलं काय?

साधारण ६ ते ९ किलो वजनाच्या या हिमालयीन गिधाडाने पंख पसरवल्यावर पंखांची विस्तारित लांबी साधारण २. ५६ ते ३. १ मीटर पर्यंत पसरते. हिमालयीन गिधाड मुख्यत्वे हिमालयाच्या उच्च प्रदेशात आणि तिबेटच्या पठारावर ३,९०० ते १८००० फूट उंचीवर राहतात त्यामुळेच अशाप्रकारे हिमालयीन गिधाडांचे दर्शन होणे हे अत्यंत दुर्मिळ मानले जाते.

Story img Loader