BJP State President Beaten Video: लाइटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असल्याचे आढळले आहे. भाजप नेत्याला लोक बेदम मारहाण करतानाच्या व्हिडिओसह असा दावा केला जात आहे की ही क्लिप मणिपूरमध्ये चित्रित करण्यात आली होती. आपण व्हिडीओमध्ये पाहू शकता की भाजपचे निवडणूक चिन्ह असलेला पट्टा गळ्यात घालून लोकांमध्ये पोहोचलेल्या नेत्यांना लोकांनी अक्षरशः जमिनीवर लोळवून चप्पलांनी मारले आहे. या व्हिडीओमागील मूळ स्थिती काहीतरी भलतीच असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. नेमकं हे प्रकरण काय, पाहूया..
काय होत आहे व्हायरल?
X युजर ‘Sandeep Chaudhary commentary’ ने व्हायरल दावा आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील व्हायरल दावा शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि त्यातून कीफ्रेम मिळवून आमची तपासणी सुरू केली. त्यानंतर आम्ही सर्व कीफ्रेमवर एक-एक करून रिव्हर्स इमेज सर्च केले. आम्हाला NYOOOZ TV च्या YouTube चॅनेलवर एक व्हिडिओ सापडला, जो सहा वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता.
व्हिडिओ चे इंग्रजी मध्ये शीर्षक होते: GNLF activists attack Bengal BJP President Dilip Ghosh in Darjeeling
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असे म्हटले आहे की: पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांना आज गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट (GNLF) समर्थकांच्या निषेधाला सामोरे जावे लागले, प्रतिनिधींनी नेत्यांना तात्काळ दार्जिलिंग डोंगर सोडण्याची मागणी केली. मात्र भाजप प्रदेशाअध्यक्षांनी आपण दार्जिलिंग येथे समस्या निर्माण करण्यासाठी आलो नाही आहोत अशी भूमिका घेत GNLF चे आरोप फेटाळून लावले. तसेच भाजप शिष्टमंडळाविरूद्धच्या निषेधांना टीएमसीने उत्तेजन दिले असाही दावा भाजप नेत्यांनी केला होता.
त्यानंतर आम्ही यूट्यूब कीवर्ड सर्च केले आणि एबीपी न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर दुसरा व्हिडीओ सापडला.
दोन्ही व्हिडिओज मधील व्हिज्युअल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या व्हिडिओसारखेच होते.आम्हाला या घटनेबाबत अनेक बातम्याही मिळाल्या.
६ ऑक्टोबर २०१७ रोजी अद्ययावत करण्यात आलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, “दार्जिलिंगमध्ये बिनय तमांग यांच्या समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाचा पाठलाग करत मारहाण केली. बिनय तमांग यांच्या समर्थकांनी घोष यांच्यावर हल्ला करताच बैठक सुद्धा रद्द करावी लागली.”
हे ही वाचा<< अरविंद केजरीवालांवर बलात्काराचा आरोप? प्रसिद्ध वृत्तपत्राचे कात्रण चर्चेत, अटकेचं खरं कारण काय?
निष्कर्ष: भाजप पश्चिम बंगालचे नेते दिलीप घोष यांचा दार्जिलिंगमधील हल्ल्याचा व्हिडिओ मणिपूरमधील असल्याचे सांगत खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे.