Boy Propose Indian Aunty Video: प्रेमाला कुठे वयाचं बंधन कळतंय असं म्हणतात पण जर ते दोन्ही बाजूने सहमतीने असेल तरच.. नाहीतर मग या पठ्ठ्यासारखी चारचौघात मान खाली घालावी लागते. सोशल मीडियावर सध्या भररस्त्यातील एक हाय व्हॉलटेज ड्रामा पाहायला मिळत आहे. यात एका प्रेमवीराने चक्क आपल्या आईच्या वयाचा काकूंना प्रपोज केल्याचे समजत आहे. काकू या मुलाचा फाजील आत्मविश्वास पाहून इतक्या भडकल्या होत्या की त्यांनी रस्त्यातच त्याची चांगली शाळा घेतली. आता आपला प्लॅन फसल्याचे कळल्यावर उरली सुरली इज्जत घेऊन पळ काढण्यासाठी हा तरुण काकूंची क्षमा मागतो पण तेव्हा त्याचं बोलणं ऐकून काकू व आजूबाजूची मंडळी एवढी भडकतात की तिथेच त्याच्या कानशिलात लगावली जाते. नेमका हा व्हिडीओ आहे तरी काय चला पाहुयात..

तर झालं असं की, व्हिडिओच्या सुरवातीलाच एक महिला तरुणावर चढ्या आवाजात आरोप लावताना पाहायला मिळत आहे. ती म्हणते, “याच्या वयाची तर माझी मुलं आहेत, निर्लाज्जासारखा अश्लील गोष्टी करतोय” असं म्हणून काकू त्याला बडबडू लागतात. यावर तो तरुण ओके ठीक आहे मला माफ करा, काकू असं म्हणतो. मग काकू ज्या काही भडकून उठतात, आता मला प्रपोज करत होता आणि आता फसल्यावर लगेच मी काकू झाले का असं म्हणत त्या पुन्हा आपल्या शब्दांचा मारा त्या तरुणावर करू लागतात. हा सगळा प्रकार पाहता बाजूला असणारे एक वयस्कर काका सुद्धा पेटून उठतात आणि सरळ त्या तरुणाच्या कानाखाली लगावतात.

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी

आधी प्रपोज केलं मग म्हणतो काकू..

हे ही वाचा<< कलियुग रे बाबा! सिंहाच्या पाठीवर बसून निघालं माकड; जंगलाच्या राजाने एका क्षणात दिला आयुष्याचा धडा

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी तरुणाच्या फजितीवर भाष्य केले आहे. म्हणून जरा वय बघून आशिकी करावी. व्हॅलेंटाईन आधी कोणी मिळेना वाटतं अशा कमेंट या व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत. काहींनी तर त्या मुलाची बाजू घेत जाऊदे ना नाही म्हणून बाजू व्हायचं असा सल्ला काकूंनाही दिला आहे.

Story img Loader