आजच्या तरुणांमध्ये डेटिंग खूपच सामान्य झाले आहे. आजकाल टिंडर, बंबल अशा अनेक डेटिंग अ‍ॅप्सवर भेटलेले तरुण-तरुणी आपल्या पहिल्या डेटसाठी कोणत्यातरी कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात. मात्र अशावेळी मुलगा आपल्या आईलाच सोबत घेऊन आला तर? तुम्हालाही आश्चर्य वाटतंय ना? पण खरंच एक तरुण आपल्या बंबल डेटला भेटण्यासाठी आपल्या आईला सोबत घेऊन गेला. पुढे काय झालं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणतीही नवीन गोष्ट करत असताना प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात दडपण येतं. अशावेळी आपले आईवडील आपल्याला आधार देतात. प्रत्येक मुलासाठी आपली आई ही अतिशय महत्त्वाची व्यक्ती असते. त्यामुळेच आपल्याला आवडणारी व्यक्ती आपल्या आईलाही आवडावी असेच मुलांना वाटत असते. मात्र एका मुलाने तर हद्दच केली. आपल्या पहिल्याच डेटवर जाताना हा मुलगा आपल्या आईला सोबत घेऊन गेला. इतकंच नाही तर त्याने या घटनेचा व्हिडीओही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या इंस्टाग्राम युजरचे नाव सिद्धेश लोकरे असे असून त्याचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल झाला आहे.

फायर हेअरकट करणं तरुणाच्या जीवावरच बेतलं; Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप

आपल्या भारतीय समाजात पालक प्रेमविवाहाच्या बाबतीत अजूनही आढेवेढे घेतात. अशातच डेटिंग हा प्रकार त्यांच्यासाठी पूर्णपणे वेगळा आहे. असे असतानाही आपल्या पहिल्या डेटवर आपल्या आईलाच सोबत घेऊन जाणे ही कल्पना न करता येण्यासारखी गोष्ट आहे. सिद्धेशने आपल्या व्हिडीओमध्ये प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने सांगितली आहे. तसेच तो, त्याची आई आणि त्याची मैत्रीण यांचा यावेळचा अनुभव कसा होता हे सुद्धा त्याने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

डेटवर पोहचल्यावर सिद्धेशची आई आणि त्याची मैत्रीण यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या हे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो. यावेळी तो आपल्या मैत्रिणीला आईच्या पायाही पडायला सांगतो. यानंतर त्या दोघी एकमेकींशी बोलायला लागतात आणि त्यांच्यात चांगली मैत्रीही होते. यावेळी ही मुलगी सिद्धेशच्या आईला बंबल अ‍ॅप आणि त्यावर डेट कसं करतात याबद्दल माहिती देताना दिसत आहे. अखेरीस दोन्ही महिलांच्या संमतीनंतर त्याने हा व्हिडिओ शूट करून अपलोड केला असल्याचे सिद्धेशने सांगितले. आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. तसेच नेटकरी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रियाही देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video boy takes mom to meet girl on bumble date you will also be amazed at what happened next pvp
Show comments