Railway Station Violence Video: लाइटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ तुफान शेअर होत असल्याचे लक्षात आले, ज्यामध्ये जमावाने मिळून रेल्वे स्टेशनची तोडफोड केली आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसामुळे लोकलचं वेळापत्रक कोलमडलेलं असताना सुरुवातीला काहींना हा प्रकार मुंबईत घडलाय का असाही प्रश्न पडला होता. त्यांनतर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील महिषासुर रेल्वे स्थानकावर, ट्रेनच्या आवाजामुळे नमाज पठणात व्यत्यय येत असल्याने स्टेशनवर तोडफोड करण्यात आल्याचा दावा व्हिडीओसह करण्यात येत होता. तपासादरम्यान आम्हाला या व्हिडीओचा मुळात सीएए आणि एनआरसी निषेधाशी संबंध असल्याचे आढळले. नेमके हे प्रकरण काय, चला पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Mini Razdan ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर युजर्स देखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केल्यावर आम्हाला आढळले की हा व्हिडिओ नवापाडा महिषासुर स्टेशनचा आहे. आम्ही आमचा तपास कीवर्ड सर्च द्वारे सुरू केला, ज्यामुळे आम्हाला ANI वर एक रिपोर्ट सापडला.

https://aninews.in/news/national/general-news/fake-news-alert-old-anti-caa-protest-video-shared-with-a-false-claim20220428232117/#google_vignette

रिपोर्ट मध्ये नमूद केले होते की महिषासुर रेल्वे स्थानकाचा म्हणत व्हायरल होणारा व्हिडिओ हा २०१९ चा आहे ज्यामध्ये CAA व NRC विरोधी आंदोलक रेल्वे स्थानकाची तोडफोड करताना दिसत आहेत. आम्हाला WildFilmsIndia च्या YouTube चॅनेलवर एक व्हिडीओ देखील सापडला, ज्याचे शीर्षक होते: पश्चिम बंगालमधील CAA/NRC विरुद्ध आंदोलनामध्ये सहभागी तरुणांनी रेल्वे स्टेशनची तोडफोड केली.

त्यानंतर आम्ही या व्हिडीओच्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केला ज्यातून आम्हाला मो. एजाज अहमद यांच्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला दुसरा व्हिडीओ सापडला.

आम्हाला १५ डिसेंबर २०१९ रोजी रिया डेच्या फेसबुक प्रोफाइलवर अपलोड केलेला तोडफोडीचा व्हिडीओ देखील सापडला.

आम्हाला चार वर्षांपूर्वी अपलोड केलेला स्थानिक व्हिडीओ रिपोर्ट देखील सापडला.

रिपोर्ट चे शीर्षक होते: নওপাড়া মহিষাসুর স্টেশনে রেলে লাইন তুলে ফেলে হল

भाषांतर: नवापाडा महिषासुर स्टेशनवर रेल्वे रुळ उचलण्यात आला २०२२ मध्ये देखील हा व्हिडीओ याच खोट्या दाव्यासह व्हायरल झाला होता.

२०२२ ची पोस्ट:

हे ही वाचा<< Fact check: लालकृष्ण अडवाणींच्या निधनाची पोस्ट व्हायरल; भाजपा नेत्यांनीही आधी वाहिली श्रद्धांजली मग कळलं सत्य

निष्कर्ष: CAA आणि NRC विरोधी निदर्शनांदरम्यान जमावाने रेल्वे स्टेशनची तोडफोड केल्याचा जुना व्हिडिओ, नमाज पठणादरम्यान रेल्वेच्या आवाजाने व्यत्यय आल्याने तोडफोड केल्याच्या खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ २०१९ चा आहे. व्हायरल झालेला दावा खोटा आहे.