Bride Groom Viral Video: आता सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. तुमच्याही सोशल मीडियाच्या फीडमध्ये दर दुसरी पोस्ट ही नव्याने लग्न केलेल्या मित्रांची असेल ना? आता एवढी लग्न होत आहेत अशात आपलं लग्न सर्वांच्या लक्षात राहावं यासाठी काहीतरी खास करण्याची प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. अनेक जण मंडपात एंट्री घेताना, काहीजण लग्न लागल्यावर, रिसेप्शनमध्ये काही ना काही हटके करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी एक सरप्राईज डान्स तर आता इतका कॉमन झाला आहे की त्यात मुळातच काही सरप्राईज राहिलेलं नाही. पण आता या व्हायरल व्हिडिओमधील नवरदेवानी आपल्या बायकोसाठी जे केलंय त्याला काही तोडच नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या कलाकार नवऱ्याने आपल्या रिसेप्शनमध्येच सर्वांच्या समोर बायकोचं एक सुंदर चित्र रेखाटलं आहे. Husband गोल्स? हो ना? अचानक नवरा आपल्या बाजूच्या सीटवरून उठतो काय.. समोर जाऊन कॅनव्हास घेतो काय.. रंग फेकून आपलं चित्र काय काढतो.. हे सगळं बघताना त्या नवरीच्या चेहऱ्यावरचा भाव इतका प्रेमळ व निरागस आहे की आपणही भारावून जातो.

वरुण जरासानिया या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये नवरोबांनी आपली बायको प्रथा वडारिया हिचे एक अत्यंत सुंदर चित्र रेखाटले आहे. सर्वात आधी वरुण कॅनव्हासवर हृदय काढतो आणि नंतर त्याच्या पत्नीचे पोर्ट्रेट उलट्या पद्धतीने काढू लागतो सुरु .चित्र पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तो कॅनव्हा सरळ करतो तेव्हा नवरी स्वतःचे चित्र पाहून थक्क होते.

“बायकोसाठी डान्स तर कुणीही करेल.. हे काहीतरी वेगळं आहे. माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे” अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.

नवऱ्याने क्षणात बायकोचं चित्र काढलं..

हे ही वाचा<< Video: बाई जीव वाचव आणि पळ.. नवरदेवाने भरमंडपात केलेली ‘ही’ धुलाई पाहून नवरीची तुम्हालाही दया येईल

१७ डिसेंबर रोजी पोस्ट केलेल्या, या व्हिडिओला १२ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर कमेंट करून नवरोबाचे कौतुक केले आहे. नवरी किती नशीबवान आहे या कमेंट्स तर मोजण्यापलीकडे आहेत. याने आता सर्व नवऱ्यांना खूप मोठं चॅलेंज दिल्याचेही काहींनी कमेंटमध्ये म्हंटले आहे.