Viral Shocking Video: इंटरनेटवर प्राण्यांच्या लढाईचे अनेक व्हिडीओ दरदिवशी व्हायरल होत असतात. काहीवेळा जंगली श्वापदांचा थरार तर काहीवेळा पाळीव प्राण्यांचे गोंडस खेळ हे व्हायरल मजेशीर व्हिडीओ दिवसभराचा थकवा घालवण्याचं काम करतात. आजही आपण असाच एक व्हिडीओ पाहणार आहोत. यावेळेस मात्र अगदी विश्वास बसणार नाही अशी लढाई ऑनलाईन पाहायला मिळत आहे. भारतीय वन्यधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या व्हायरल व्हिडीओ मध्ये चक्क बैल आणि वाघाची लढत दिसून येत आहे. बैल काय वाघाशी लढणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जर हा व्हिडीओ पूर्ण पाहा.

हा व्हिडीओ शेअर करताना आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी कॅप्शन देत म्हंटले की. ” धैर्य अशक्य ठिकाणी आढळते…कदाचित मानवी हल्ल्यांमुळे वाघाचे बळ कमी होऊन तो आता प्राण्यांना सुद्धा घाबरू लागला आहे”

(Video: १४ सिंहिणींचा एका हत्तीवर हल्ला; बुद्धिमान गजराजांनी असं काही केलं की बघून तुम्हीही म्हणाल वाह्ह)

बैल आणि वाघ हे तसे दोघेही चपळ व बलवान प्राणी आहेत पण या दोघांची तुलना करायची तर वाघाला कधीही अधिक वरचा हात मिळेल. मात्र या व्हायरल व्हिडीओमध्ये आपल्या कल्पनेच्या अगदी विरुद्ध घटना घडताना दिसते. आपण सुरुवातीला पाहू शकता की वाघ जंगलातील झाडीतून बाहेर येत आहे, लगतच्या रस्त्यावर एक बैल सुद्धा चालताना दिसतोय. आता वाघ या बैलावर हल्ला करून त्याचा फडशा पाडणार असे आपल्याला वाटू शकते पण इतक्यात बैल इतक्या वेगाने पळत येतो की त्याला बघून वाघोबांची चांगलीच घाबरगुंडी उडते आणि आल्या मार्गे ते पुन्हा जंगलात पळत सुटतात. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर स्वतःच हा व्हिडीओ पाहा..

हा व्हिडीओ शेअर केल्यापासून, याला १७ हजारपेक्षा जास्त व्ह्यूज आणि ९०० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. शेकडो ट्विटर युजर्सनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

Story img Loader