Viral Video: ठिकठिकाणी जंगलतोड केल्यामुळे जंगलातील प्राण्यांच्या चारा व पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित होतो. जंगलातील वन्यजीव अन्न पाण्याच्या शोधात सगळीकडे वणवण भटकत आहेत. जंगलात अन्न पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे या प्राण्यांनी नागरी वस्तीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अन्नासाठी एका हत्तीने गोडाऊनचे शटर तोडून अन्न मिळवले आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका कॉलनीतील परिसरात जंगलातील हत्ती वावरताना दिसत आहे. तसेच हत्तीला पाहून आजूबाजूच्या परिसरातील मंडळी पळापळ करताना दिसत आहेत. पण, हत्ती निवांत स्वतःचा रस्ता काढून एका गोडाऊनपर्यंत पोहचतो. गोडाऊनचे शटर सोंडेच्या मदतीने तोडतो आणि मग आतमध्ये अन्न भरून ठेवलेली एक गोणी सोंडेने बाहेर काढून घेतो. एकदा पाहाच हा व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, अन्न पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या हत्तीने स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढला आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना कोणतीही इजा न पोहचवता गोडाऊनचा दरवाजा तोडून अन्नाची गोणी सोंडेने बाहेर काढली आहे. त्यानंतर पायाने गोणी फोडून त्यातील अन्नाचे सेवन करताना दिसला आहे; जे पाहून तुम्हाला नवल वाटेल आणि तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
सोशल मीडियावर ही पोस्ट @nareshbahrain या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून हत्तीचे कौतुक तर केलेच, पण काही जणांनी वन्य प्राण्यांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत प्रशासनाने या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे, असे नेटकरी कमेंटमध्ये म्हणत आहेत. तसेच एक्स युजर नरेश नंबिसन म्हणाले की, प्राण्यांची ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जंगलात पाणीटंचाई असल्यामुळे तेथे खड्डे खोदले जात असून ते टँकरने भरले जात असल्याची माहिती त्यांनी कमेंटमध्ये दिली आहे.