Cat Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ दरदिवशी व्हायरल होत असतात. काहींसाठी गोंडस कुत्र्या- मांजरांचे व्हिडीओ म्हणजे दिवसभराचा थकवा घालवण्याचा एक सोपा मार्ग ठरतो. काही वेळेस ही व्हिडीओ आपल्याला प्राणी फक्त बोलता येत नाही म्हणून माणसांपेक्षा कमी नाहीत हे अक्षरशः डोळे उघडून पाहायला लावणारे असतात. आज व्हायरल होणारा व्हिडीओ सुद्धा असाच काहीसा आहे. असं म्हणतात की, निसर्गाने प्रत्येकाला एखादी खास गोष्ट दिलेली असते ज्यामुळे आपल्याला आपल्यातील काही कमतरतांची उणीव भरून काढता येऊ शकते. याच नियमाने व्हायरल व्हिडिओमधील मांजरीला भन्नाट बुद्धी व तिच्या कर्णबधिर मालकाला समजूतदारपणाचे वरदान मिळालेलं दिसतंय.

तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या मांजरीसह एका हॉटेलमध्ये बसलेला दिसतोय. स्क्रीनवर लिहिलेल्या मजकुरानुसार ही व्यक्ती कर्णबधिर आहे. कदाचित ही मांजर अनेक वर्षांपासून या व्यक्तीसह राहत असावी. कारण कितीही ओरडलं तरी आपल्या मालकाला ऐकू येत नाही हे तिला चांगलंच कळलंय. म्हणूनच या व्हिडिओमध्ये मांजरीने आपलं म्हणणं समजावून सांगण्यासाठी वेगळाच फंडा वापरला आहे. मांजरीचे हे टॅलेंट बघून सर्वच थक्क झाले आहेत.

cat rescued By Young Boy
VIDEO: खिडकीवर अडकलेल्या मांजराला ‘त्याने’ असे वाचवले; मांजरीचे थरथरणारे पाय पाहून नेटकरीही भावूक झाले
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
Viral Video Of pet dog
VIDEO: ‘भिंतीवर टांगून ठेवेन…’ घरात वस्तूंची फेकाफेकी करणाऱ्या श्वानाची आईने काढली खरडपट्टी; पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही हसाल
Dog Helps Small Kitten and carefully carrying in to the roadside
आता मानवानेच प्राण्यांकडून शिकावा माणुसकीचा धडा! भटक्या मांजरीच्या पिल्लाला श्वानाच्या मदतीचा हात; एकदा व्हायरल VIDEO पाहाच
Little one's Hilarious video
Video : याला भीती वाटत नाही का? चिमुकल्याने हातात पकडली पाल अन् हसत हसत आईकडे धावला…; पाहा मजेशीर व्हायरल व्हिडीओ
Viral Video Of Elephant
हत्तीचा मालकाकडे हट्ट! हातातील काठी काढून घेतली आणि मग… VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘किती प्रेमळ…’
Shocking video The Viral Girl Monalisa Breaks Youtubers Camera Mahakumbh 2025
“प्रसिद्धीची हवा एवढ्या लवकर डोक्यात घुसली?” महाकुंभमेळ्यातील सुंदर मुलीनं युट्यूबरसोबत काय केलं पाहा; VIDEO झाला व्हायरल

Video: कर्णबधिर मालकासाठी मांजर शिकली ‘ही’ कला

हे ही वाचा<<वजनावरून महिलेचा भयंकर अपमान; एअरपोर्टचा ‘हा’ Video पाहून लोकं म्हणतात, “एवढी लाज कधीच वाटली नाही”

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच यावर ८ लाखाहून अधिक लाईक्स व दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत या व्यक्तीस नशीबवान म्हटले आहे. “आता मांजरीला पण साइन लँग्वेज येतेय पण मला नाही”, “आमची मांजर तर इशारा नाही थेट हल्लाच करायला तयार असते” अशा वेगवेगळ्या मजेशीर कमेंट सुद्धा या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून कळवा.

Story img Loader