सामान्य मराठी माणसाला एका खेळातून करोडपती होण्याचं स्वप्न दाखवणारा आणि त्यासाठी संधी देणारा कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा केवळ खेळ नाहीये तर यात प्रेक्षक स्पर्धकासोबत भावनिकरित्या गुंतलेल्या असतो. या स्पर्धकाने जिंकावं किंवा हा खेळत का नाहीये, अशा गोष्टींबाबत त्याला उत्सुकता असते, त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा सुद्धा वाढते. ज्ञान आणि बुद्धी यांच्या जोरावर करोडपती होण्याची अनोखी संधी देणार्‍या ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमातील एक एपिसोड सध्या चांगलाच चर्चेत असून सोशल मीडियावर या शोमशमधील एका महिला स्पर्धकाला ट्रोल करण्यात येत आहे.

ही महिला शिक्षिका आहे. ती या शो मध्ये सहभागी झाली होती. तिला छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातला एक प्रश्न विचारण्यात आला होता. पण या प्रश्नाचं उत्तर तिला देता आलं नाही. तिनं या प्रश्नाच्या उत्तरासाठी व्हिडिओ फ्रेंड ही लाइफ लाइन वापरली . शिक्षिका असूनही या प्रश्नाचं उत्तर न आल्यानं या महिलेला ट्रोल करण्यात येत आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?, तयारी नसताना स्पर्धेत गेलातच का? या शिक्षिकेला पुन्हा चौथीत बसवा, या स्थितीला नवे शिक्षण धोरण जबाबदार अशा प्रतिक्रिया देत तिला जोरदार ट्रोल केलं जात आहे. तर काहींनी तिची बाजू सुद्धा घेतली आहे.

काय आहे प्रश्न?

नुकत्याच पार पडलेल्या एका भागात एक महिला शिक्षिका सहभागी झाली होती. दरम्यान त्या शिक्षिकेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या किल्ल्यावर झाला? असा प्रश्न विचारण्यात आला आणि प्रतापगड, शिवनेरी, सिंहगड, रायगड हे चार पर्याय देण्यात आले. पण संबंधित शिक्षिकेला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही आणि तिने व्हिडीओ फ्रेंड या लाइफ लाइनचा वापर केला.

शिक्षिका असूनही या प्रश्नाचं उत्तर आलं नाही

शिक्षिका असूनही शिवाजी महाराजांसंबंधित सोप्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नसल्याने महिलेला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. शिक्षिकेचं MSC B.ed पर्यंतचं शिक्षण झालं असूनही तिला या सोप्या प्रश्नाचं उत्तर देता आलेलं नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या पुर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख प्रा.शिल्पा बोडखे यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – शाळेत मुलांना अभ्यासाबरोबर पालकांच्या मेहनतीचे धडे! पालकांचे VIDEO बघून धाय मोकलून रडू लागली लेकरं

छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? या प्रश्नाचं उत्तर ‘रायगड’ आहे. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. महाराजांनी याच किल्ल्यावर स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं. महाराजांचा राज्यभिषेक, समाधी, जगदिश्वराचे मंदिर, राजदरबार अशा अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक गोष्टी या किल्ल्यावर असल्यानं हा किल्ला महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान बनला आहे.