आजपर्यंत आपण एवढंच ऐकलं होतं की वृक्ष, झाडे आपणास ऑक्सिजन देतात, वृक्ष आपल्याला सावली देतात, विविध प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वनस्पती, पिके आपल्याला फळे, भाज्या देतात. घरासाठी लागणारे लाकूडसुद्धा याच वृक्षांपासून आपणास मिळते. वृक्ष मानवी जीवनचक्राचा एक अविभाज्य घटक आहे. हे सर्व काही आणि अश्या बऱ्याच गोष्टीही वृक्ष आपल्याला देतात, पण वृक्ष आपल्याला पाणी देऊ शकतात का? वृक्षातून पाण्याचा झरा वाहत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नसतो, याचा प्रत्यय आंध्र प्रदेशात आला आहे. झाडातून पाणी वाहत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. आंध्र प्रदेशातील वन विभागातील काही कर्मचाऱ्यांनी इंडियन लॉरेल वृक्षाच्या खोडावरील काही भाग तोडल्यानंतर त्यातून अचानकच पाणी बाहेर पडल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. पाणी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. हा कसला चमत्कार, म्हणत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
(हे ही वाचा : रेल्वेच्या आरक्षित कोचमध्ये फुकट्यांची मोठी गर्दी; व्हायरल पोस्टवर रेल्वेचे ‘असे’ उत्तर ऐकून प्रवाशांनी व्यक्त केला संताप )
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक वनरक्षक कुऱ्हाडीने झाडाला मारतो आणि झाडाची साल तोडल्याबरोबर झाडातून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू होताना दिसतो. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, या झाडातून पाणी कसे बाहेर येत आहे. खरंतर हे झाड इतरत्र कुठेही आढळत नाही, परंतु आपल्याच देशात आढळते. त्यातून बाहेर पडणारे पाणी पूर्णपणे स्वच्छ आणि पिण्यास योग्य आहे.
येथे पाहा व्हिडिओ
या झाडाचं नाव ‘टर्मिलिया टोमेनटोसा’ (Terminalia Tomentosa) असं आहे. या झाडाला ‘क्रोकोडाइल बार्क ट्री’ (Crocodile Bark Tree) असेही म्हणतात. हे झाड आंध्र प्रदेशातील गोदावरी परिसरातील पापीकोंडा राष्ट्रीय अभयारण्यात आढळून आल्याची माहिती आहे. या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे, ही झाडे ३० मीटर उंच वाढतात. ती मुख्यतः शुष्क आणि दमट जंगलात आढळतात. या झाडांची खोडं पाण्याने भरलेली असतात. हा व्हिडीओ IFS नरेंद्रन (@NarentheranGG) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी झाडाशी संबंधित महत्त्वाची माहितीही लोकांना दिली आहे.