धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असला तरी राज्य शासन या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात रविवारी आयोजित धनगर मेळावा आणि सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शिंदे यांनी ओबीसी आरक्षण कसं मिळवून दिलं यासंदर्भातही भाष्य केलं. मात्र याबद्दल बोलताना त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेबद्दल उच्चारलेल्या एका शब्दानंतर ते स्वत: भाषण देताना थांबले आणि सभागृहात एकच हशा पिकला.
नक्की पाहा >> Video: “…नाहीतर आमचाच ‘कार्यक्रम’ झाला असता”; गळ्यावरुन हात फिरवत जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं विधान
“ओबीसी आरक्षणाचा निर्णय प्रलंबित होता. तुम्ही सध्या त्याच आरक्षणात आहात ना. मी ओबीसी आरक्षणासाठी तीन वेळा दिल्लीला गेलो माझी सगळी कामं बाजूला ठेऊन. तिथले वकील, महाअधिवक्ते या सर्वांच्या भेटी घेतल्या,” असं शिंदे म्हणाले. उपस्थितांमध्ये बसलेल्या मोटे वकिलांकडे पाहून शिंदे यांनी, “इथे मोटे साहेब बसलेले आहेत. त्यांना माहितीय कशी वकिलांची टीम तयार करावी लागते. कशी फिल्डींग, फिल्डींग नाही,” असं म्हणाले आणि मोटेंसहीत सभागृहातील सर्वच उपस्थित हसू लागले. थोडा वेळ भाषण थांबवून शिंदे यांनी पुन्हा, “सर्व तयारी करावी लागते. कोणी काय जबाबदारी पार पाडायची हे ठरवलं जातं,” असं म्हटलं.
नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंच्या ‘वडील चोरायला निघाले’ टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले, “त्यांच्या आशीर्वादामुळेच हे…”
“न्यायालयात पुरावे आणि माहिती लागते. ती नीट सादर केली पाहिजे. आम्ही आयोग नेमला. त्याला मदत केली. त्यांच्या अडचणी दूर केल्या. तज्ज्ञ वकिलांना समजावून सांगितलं हा ओबीसीचा निर्णय महाराष्ट्राला किती महत्वाचं आहे. सर्व म्हणणं मांडल्यानंतर ओबीसी समाजाला न्याय मिळाला,” असं शिंदे म्हणाले.
नक्की पाहा >> Photos: …अन् आदित्य ठाकरेंनी त्यांच्या डोक्यावर छत्री पकडली; नंतर त्यांनी फडणवीसांवर टीका करत म्हटलं, “सात वर्षात एकदाही…”
आहिल्याबाईंचे स्मारक
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्व सोई-सुविधा दिल्या जातील. समाजाच्या सर्वागीण विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल. विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातील. अहिल्याबाई होळकर यांचे भव्य स्मारक व्हावे ही माझीही इच्छा आहे. राज्यात त्यांचे भव्यदिव्य स्मारक उभारले जाईल. अहमदनगरला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याची बाब तपासून कार्यवाही करण्यात येईल.
धनगरांसाठी घोषणा
आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेतले जातील. धनगर वाडय़ा वस्त्यांमध्ये सोयीसुविधा दिल्या जातील. तसेच आत्मदहन करणाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये देऊ व त्यांना नोकरी देण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.