Couple On Bike Viral Video: मागील काही दिवसात बेभान जोडप्यांच्या विचित्र हरकतींमुळे वेगवेगळ्या शहरातील वाहतूक पोलीस हैराण झाले आहेत. बाईकवर गर्लफ्रेंडला बसून फिरवताना काहीजण आपल्या सर्व मर्यादा विसरून वावरतात आणि म्हणूनच स्वतःसह इतरांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. आधी मुंबई, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश यापाठोपाठ आता लखनऊमधून सुद्धा एका बाईकस्वार जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक तरुण बाईक चालवताना त्याची प्रेयसी बाईकच्या टाकीवर त्याच्या पुढ्यात घट्ट मिठी मारून बसली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित प्रेयसी ही अल्पवयीन असल्याचे समजत आहे.
प्राप्त माहितीनुसार हा व्हिडीओ हजरतगंज भागातील आहे. मंगळवारी सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये हे जोडपे अश्लील कृत्य करताना दिसले. मध्य लखनऊचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त (ADCP) राजेश श्रीवास्तव यांनी बुधवारी एएनआयला सांगितले की, “लखनऊमधील हजरतगंज पोलिस स्टेशन परिसरात, काल एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये एक पुरुष आणि एक अल्पवयीन मुलगी स्कूटरवर अयोग्य पद्धतीने बसलेले दिसत आहे. स्कूटर चालवणारा २३ वर्षीय विकी शर्मा याला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याची स्कूटर जप्त करण्यात आली आहे. या तरुणावर IPC कलम 294, 279 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
बेभान जोडप्याने ओलांडली मर्यादा
हे ही वाचा<< ४९ व्या वर्षी बाईने नवऱ्याला सोडून कुत्र्याशी का केलं लग्न? २०० लोकांसमोर सांगितलं “माझा नवरा जे प्रेम..”
दरम्यान,पोलिसांनी सांगितले की, आरोपी तरुण ग्रामीण भागातील असून त्याच्यासोबत असलेली मुलगी अल्पवयीन असल्याचे समजतेय.हा प्रकार सुरू असताना पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.