Vande Bharat Express Cow Video: भरधाव वेगाने येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांच्या धक्क्याने आतापर्यंत अनेक गुराढोरांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना आजवर अनेकदा घडल्या आहेत. पण सध्या चर्चेत असणारं एक प्रकरण माणुसकीचा दाखला देत शेअर केलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या लोकोमोटिव्ह पायलटने आपत्कालीन ब्रेक लावून एका गायीला वाचवल्याचे दिसत आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून यानंतर लोकोपायलटच्या समयसूचकतेचे अनेकांनी कौतुक केले आहे. तसेच गुराढोरांना रेल्वे रुळांमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत रेल्वे प्रशासनाची कानउघाडणी सुद्धा लोकांनी केली आहे. अवघ्या काही सेकंदाने गायीचा जीव वाचला असला तरी अशा बेजबाबदारपणामुळे कित्येकांनी आतापर्यंत जीव गमावलाय व अजूनही कित्येकांचा जीव धोक्यात आहे अशा प्रकारच्या कमेंट्ससह हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेमकं हे प्रकरण काय चला पाहूया..

व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, वंदे भारत एक्सस्प्रेस रुळावरून जाणार असतानाच ही गाय रेल्वे ट्रॅक क्रॉस करत होती. सुदैवाने गाडीचा वेग कमी होता आणि लोको पायलटला लांबूनच गाय दिसली होती. त्यामुळे त्याने आपत्कालीन ब्रेक मारून गाडी थांबवली. एक्सस्प्रेसखाली गायीचं अर्धं शरीर अडकल्याने तिला वेदना होत होत्या पण ती जिवंत होती. गायीचा जीव वाचवण्यासाठी मग हुशारीने लोको पायलटने गाडी मागे घेतली त्यानंतर गाय स्वतः उभी राहिली आणि रूळ पार करून सुखरूपपणे निघून गेली. एरवी एक्सस्प्रेस ज्या वेगाने जातात त्यावेळी ब्रेक मारणे शक्य असेलच असे नाही अन्यथा रेल्वेचे मागचे डबे घसरण्याची शक्यता असते.

The young woman hit under the donkey's ear
पाठलाग करणाऱ्या गाढवाबरोबर तरुणीनं केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
The young man holding paati wrote funny message
“सुंदर बायको भेटायला नशीब नाही, तर..” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO होतोय व्हायरल
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
bull Fight Viral Video | Bull Attack on boy Wearing Red Shirt
“शिंगांनी उडवलं अन् लाथांनी तुडवणार इतक्यात…”, पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video

दरम्यान, अलीकडेच घडलेल्या एका घटनेत दिल्लीहून कानपूरच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या धडकेत एका गायीचा मृत्यू झाला होता. याही घटनेत ट्रेनच्या मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक लावला खरा पण तेव्हा गायीचा अगोदरच रेल्वेच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला होता. यानंतर गायीचा मृतदेह ट्रेनखालून काढण्यासाठी ट्रेनला दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबवावे लागले होते. दिल्ली-हावडा मार्गावर ही घटना घडली होती.

हे ही वाचा<<“वासनेच्या आहारी गेलेले..”, बेभान जोडप्याचा बाईकवर अश्लील स्टंट पाहून लोकांची टीका; पोलिसांनी Video काढला, मग..

दुसरीकडे या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतांश युजर्सनी “चालकाच्या माणुसकीला व हुशारीला सलाम” असे म्हणत मोटारमनचे आभार मानले आहेत. तर काहींनी रेल्वे मंत्रालयाला टॅग करून ही गाय वाचली, बाकीच्या गाईंचं काय असा प्रश्न केला आहे. गुरंढोरं केवळ ट्रेनच्या मार्गातच नव्हे तर अनेकदा भररस्त्यात सुद्धा स्वैर संचार करत असतात ज्यामुळे रस्ते अपघात होण्याची शक्यता असते. जीव गायीचाही जाऊ शकतो किंवा प्रवाशांचा सुद्धा अशावेळी दोघांच्याही जीवाशी खेळ करण्यापेक्षा प्राण्यांना रस्ते किंवा रुळावर येण्यासाठी प्रतिबंध घालता येईल असे उपाय शोधायला हवेत असेही काहींनी लिहिले आहे.