Man Falls Down From Jugadu Seat In Train: भारतीय रेल्वेच्या आजघडीला शेकडो गाड्या कार्यरत आहेत. अगदी भारतातील कानाकोपऱ्याला जोडणारी रेल्वे सेवा ही देशाची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. पण इतक्या मोठ्या संख्येत ऑपरेशन सुरु असूनही ट्रेनमध्ये बसायला कन्फर्म जागा मिळवणे हे प्रत्येकासाठीच अत्यंत कठीण काम ठरते. अर्थात कोणत्याही प्रश्नावर जुगाडू उत्तर शोधणे ही भारतीयांची सवय किंबहुना स्वभावच आहे असं म्हणता येईल. काही वेळा यातले एकही जुगाड एकदम हिरो ठरतात तर काही वेळा जुगाडाचा पुरती माती होऊन जाते. रेल्वेमध्ये तर दुसऱ्या दिवशी भन्नाट कल्पक डोक्यातून आलेल्या आयडीयाजचं प्रदर्शन लागलेलं असतं. आज सुद्धा आपण असाच एका पठ्ठ्याचा जुगाड पाहणार आहोत. दुर्दैवाने हा जुगाड जरी फ्लॉप झाला असला तरी व्हिडीओ मात्र एवढा हिट झालाय की साधारण लाखाहून अधिक व्ह्यूज अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर या क्लिपला मिळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वीचे ट्विटर म्हणजेच X वर व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये आपण पाहू शकता की ही एक गच्च भरलेली ट्रेन दिसत आहे. ट्रेनचा जनरलचा हा डब्बा असावा. यामध्ये दोन्ही बाजूला लोक बसलेले दिसतायत. अशातच एक पठ्ठ्या आपल्याकडील एक पंचा घेऊन स्वतःसाठी जुगाडू सीट बनवायचा प्रयत्न करतो. दोन्ही बाजूच्या हॅण्डलवर पंचाची टोकं नेत त्याने लहान मुलांसाठी बांधतात असा एक पाळणा तयार केला आहे. दोन्ही बाजूच्या सीट्स, सामान ठेवण्यासाठीची जागा असा एकूण वापर करत तो पठ्ठ्या या पाळण्यात बसायचा प्रयत्न करतो. पण अंग खाली टेकतो तोपर्यंतच त्याचा पाळणा निसटतो आणि पाळण्यासह हा जुगाडू पण खाली कोसळतो.

हे ही वाचा<< मगरीच्या जबड्यातून बाहेर आला जिवंत माणूस, Video पाहून उडेल थरकाप पण त्यापेक्षा आधी हातात जे दिसलं..

दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यावर साहजिकच लोकांनी यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. काहींना बिचाऱ्याची मेहनत वाया गेल्याचं दुःख झालं आहे तर काहींनी तशी आयडिया चांगली होती पण कपडा जाड हवा होता असे म्हटले आहे. काहींनी तर समजा चुकून कोणी खाली बसलेलं असेल तर याने नक्कीच मार खाल्ला असणार असंही म्हटलं आहे. परवडणाऱ्या दरात प्रवास करायचा म्हणून अनेकजण ट्रेनला प्राधान्य देतात पण ही इतकी गर्दी हा खरोखरच गंभीर विषय आहे.