Viral Video: उंची, वजन, चेहऱ्याचा आकार, कंबरेची रुंदी, रंग, गालावर तीळ, असे हजारो सौंदर्याचे निकष आपण आजवर ऐकले आहेत. बहुतांशवेळा आपण कसे या निकषांमध्ये बसत नाही यावरून विनाकारण टोमणे ऐकलेही असतील. अर्थात हे आपल्या सर्वांसाठीच दुर्दैवी आहे पण विचार करा हेच प्रश्न अवघ्या तीन- चार वर्षाच्या बाळाला पडू लागले तर… सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात एका चिमुकलीने चक्क आपल्या आईसमोर अत्यंत हृदय पिळवटून टाकणारा प्रश्न केला आहे. या मुलीने आपल्या आईला विचारले की, “आई, मी कुरूप आहे का?” . विचार करा एखाद्या लहानग्या बाळाने आपल्याला हा प्रश्न केला तर आधी गांगरून जायला होईल ना? मुळात या बाळाला असा प्रश्न कसा पडला या विचाराने स्वतःचा रागही येऊ शकतो ना? पण या आईने आपल्या बाळाला अत्यंत सुंदर उत्तर दिलेलं आहे.
तुम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, या मुलीने आईला आपण कुरूप आहोत का असा प्रश्न केल्यावर आई तिला आश्चर्यचकित होऊन काय विचारते व मग म्हणते, ” तू असं कधीच बोलू नकोस, तू जेव्हा स्वतःकडे पाहशील तेव्हा स्वतःला सांग तुझी त्वचा चॉकलेटी रंगाची सुंदर आहे, तुला गोड खळ्या पडतात, तू सुंदर आहेस, तुझ्या वर्गात तुझ्या मैत्रिणींमध्ये तू सगळ्यात सुंदर आहेस, आणि तुला जर हे इतर कोणी सांगितले नाही तरी मी तुला सांगतेय, मी सुंदर आहे आणि तू माझी मुलगी आहेस तू पण सुंदर आहेस.” हे ऐकून ती चिमुकली पण रडू लागते आणि नेटकरीही हा व्हिडीओ पाहून भावुक होतात.
Video: आई, मी कुरुप आहे तर…
हे ही वाचा<< फ्रीज शिवाय कुल्फी! काकूंचा जुगाड पाहून आनंद महिंद्राही थक्क; Video पाहून म्हणाल, “बाईचं डोकं काय चालतं”
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर खूप प्रेम व पाठिंबा दर्शवला आहे. या व्हिडिओला तब्बल २० लाख लाईक्स व हजारो कमेंट्स आहेत. उद्या मोठं झाल्यावर या मुलीला कदाचित इतरांचे टोमणे- टीका लक्षात राहणार नाहीत पण तिच्या आईचे प्रेम नक्कीच लक्षात राहील बळ देईल असे नेटकऱ्यांनी म्हंटले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.