Dashing Indian Uncle Viral Video: आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याची सोय करण्यासाठी आयुष्यभर राब राब राबतात. पण काही दुर्दैवी पालकांना हीच मुलं नंतर दारात सुद्धा उभं करत नाहीत. आयुष्याचा ऐवज मुलांच्या नावावर करणाऱ्या सर्व पालकांना जणू काही धडा शिकवायला निघालेले एक काका सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. @dharambirharayana अशा अकाउंटवरून ते आपल्यासारख्याच समवयस्क पालकांना धडे देताना पाहायला मिळतात.
तुम्हाला आठवत असेल काहीच दिवसांपूर्वी या काकांचा एक व्हिडीओ तुफान चर्चेत होता. निवांत स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना त्यांनी “मी माझ्या मुलांना एक रुपयाही देणार नाही, मी आता निवृत्त झालो आहे आणि मजा करणार आहे” असा व्हिडीओ बनवला होता. आता याच व्हिडिओची त्यांच्या लेकाला व सुनेला माहिती मिळाली आहे आणि मग घरात काय रामायण सुरु आहे हे सांगत त्यांनी नवा व्हिडीओ बनवला आहे.
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ते आपल्या नेहमीच्या शैलीत बोलत सांगतात की, “माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे याबाबत माझ्या लेकाला व सुनेला कळलं आहे आणि ते मला घरातून बाहेर काढायचा विचार करतायत पण त्यांना मी असं करूच देणार नाही कारण सगळी प्रॉपर्टी मी माझ्याच नावावर करून ठेवली आहे”
Video: प्रॉपर्टी माझ्या नावावर, आता मला सून…
दरम्यान, या व्हिडिओवर सुद्धा अनेकांनी वाह्ह असं पाहिजे, वाह्ह तुम्ही तर किंग आहात असे म्हणत कमेंट केल्या आहेत. काकांच्या ढासू अंदाजाच्या चाहत्यांनी सुद्धा असंच पाहिजे, मुलांना शिकवून सक्षम करणे हे आपले काम असते आयुष्यभर पोसणे नाही, पालकांनी मुलांना स्वावलंबी करायला पाहिजेच असे म्हणत व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.