Anand Mahindra Viral Desi Jugaad Video: सोशल मीडियावर अलीकडे जुगाड व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात. काही हुशार डोक्याची बुद्धी पाहून तर भलेभले थक्क होतात. अशाच एका भारतीय काकूंचा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी छान थंडगार कुल्फी खायला मिळावी अशी तुमचीही इच्छा होते का? त्या कुल्फी इतकाच कूल असा शोध काकूंनी लावला आहे. चक्क फ्रीजशिवाय काकूंनी घरच्याघरी कुल्फी बनवली आहे. महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सुद्धा हा अविष्कार पाहून थक्क झाले आहेत. काकूंनी ही कमाल नेमकी केली तरी कशी याचा व्हिडीओ आपण पाहूया…
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये आपण काकूंचा देसी जुगाड पाहू शकता. काकू सर्वात आधी एका स्टोव्हवर दूध उकळून घेतात व घट्ट झाल्यावर त्याला एका लंबगोलाकार भांड्यात काढतात. मग हे भांडे दुसऱ्या मोठ्या भांड्यात ठेवतात. या दोन भांड्यांच्या मधल्या मोकळ्या जागेत त्या बर्फाचे मोठमोठे तुकडे ठेवतात. मग त्या दुधाचं भांडं रश्शीच्या साहाय्याने पंख्याला बांधतात. जसा पंखा फिरतो तसे हे भांडे फिरत जाते. आणि हळूहळू दूध आणखी घट्ट होऊन याची कुल्फी तयार होते. महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना “जिथे इच्छा तिथे मार्ग, हॅन्डमेड व फॅन मेड आईस्क्रीमचा चमत्कार” असे कॅप्शन दिले आहे.
Video: फ्रीज शिवाय काकूंनी बनवली कुल्फी…
हे ही वाचा<< पाण्याविना वापरायचं टॉयलेट बनवून महिलेने केला भलताच जुगाड! Video मध्ये बघा विष्ठेची राख कशी होते?
या व्हिडिओवर अगोदरच मिलियन्स व्ह्यूज होते. आनंद महिंद्रा यांनी शेअर केल्यावर तर मूळ व्हिडीओ आणखीनच व्हायरल झाला आहे. याशिवाय व्हिडिओवर तब्बल ४६ हजार लाईक्स व शेकडो कमेंट्स आहेत. अनेकांनी या काकूंचे कौतुक केले आहे. भारतीय लोक मुळात असतातच हुशार. हे असे टॅलेंट देशभर जायला नको अशा कमेंट सुद्धा अनेकांनी केल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ आवडला का? जरी आवडला असेल तरी असा प्रयोग तुम्ही घरी करायला जाऊ नका हे असुरक्षित ठरू शकते.