आपल्या देशात अनेक धार्मिक गोष्टींना मान्यता आहे. आपल्या देशातील लोकं फारच श्रद्धाळू आहेत. त्यांचा देवधर्मावर खूपच विश्वास असतो. एखाद्या समस्येचे निराकरण होत नसेल तर देवाकडे मनोभावे प्रार्थना करणे, हा शेवटचा प्रयत्न लोकं करतात. यासाठी देवाला नवस बोलला जातो. या गोष्टी फार पूर्वीपासून आपल्याकडे चालत आल्या आहेत. परंतु भारतात असे एक मंदिर आहे जिथे लोकांचा नवस पूर्ण झाल्यावर ते देवाला चक्क दारू अर्पण करतात.
पंजाबच्या अमृतसर भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील भोम गावात बाबा रोडे शाह दर्ग्यामध्ये नवस पुर्ण झाल्यावर दारू अर्पण केली जाते आणि भक्तांमध्ये वाटली जाते. सध्या सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. बाबा रोडे शाह यांच्या दर्ग्यावर दोन दिवसीय वार्षिक जत्रा भरते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. नवस पूर्ण झाल्यानंतर लोक बाबा रोडे शाह यांच्या दर्ग्यावर दारू अर्पण करतात आणि नंतर प्रसाद म्हणून दारूचे वाटप करतात.
६३ वर्षाच्या आजींचा डान्स बघून तुम्हीही तोंडात बोटं घालाल; Viral Video सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
पोलिसांनाही ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ; डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल
अमृतसरच्या भोमा गावात बाबा रोडे शाह यांच्या दर्ग्यावर दरवर्षी ही जत्रा भरते. समाजात दारूला वाईट मानणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी बाबा रोडे शाह यांच्या दर्ग्यावर प्रसाद स्वरूपात दारू देण्याची अनोखी प्रथा आहे. बाबा रोडे शाह यांच्या दर्ग्याला आजूबाजूच्या परिसरात बरीच मान्यता आहे. नवस करण्यासाठी दूरदूरवरून भाविक मोठ्या संख्येने दर्ग्यावर पोहोचतात आणि त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर ते बाबा रोडे शाह यांच्या दर्ग्यावर दारू अर्पण करतात.