अंकिता देशकर

Bharatnatyam At Disneyland: इंडियन एक्सप्रेसला सोशल मीडियावर तुफान शेअर होणारा एक व्हिडीओ आढळून आला. ज्यामध्ये नर्तक भारतीय शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम सादर करताना दिसत होते. व्हिडिओमध्ये असा दावा केला जात होता की, हे नर्तक मानवी नर्तक नसून चीनमध्ये बनवलेले रोबोट असून आता शांघायमधील डिस्नेलँडमध्ये आपले सादरीकरण करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय होत आहे व्हायरल?

तपास:

इंडियन एक्सप्रेसने इनव्हीड टूलद्वारे प्राप्त केलेल्या कीफ्रेमपैकी एकावर Google रिव्हर्स इमेज सर्च केले. या सर्च द्वारे आम्ही ‘Indian Raga’ च्या यूट्यूब चॅनेल वर पोहोचलो. व्हायरल व्हिडिओ याच चॅनेलवर अपलोड केलेला असतो. या व्हिडिओचे टायटल होते, वहना अलिरिप्पू: भरतनाट्यम नृत्य | सर्वोत्तम भारतीय शास्त्रीय नृत्य

या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओ मधील नृत्यांगना सोफिया सॅलिंगरोस आणि ईशा परपुडी आहेत.

बायो तपासल्यावर, आम्हाला आढळले की ‘Indian Raga’ ही MIT-स्थापित परफॉर्मिंग आर्ट कंपनी आहे जी ४० पेक्षा जास्त जागतिक शहरांमध्ये कार्यरत आहे. या पेजवर ६५ देशांमध्ये, १०० दशलक्षाहून अधिक प्रेक्षकांनी पाहिलेले ७०० व्हिडिओ तयार केले आहेत.

आम्हाला Sophia Salingaros चे YouTube चॅनल देखील सापडले, जिथे तिने तिच्या विविध नृत्य सादरीकरणाचे अधिक व्हिडिओ अपलोड केले होते.

हे ही वाचा<< वंदे भारत एक्सप्रेसच्या छताला गळती? लोको पायलट छत्री धरून ट्रेन चालवतानाचा Video पाहून बसेल धक्का पण…

निष्कर्ष: व्हायरल व्हिडीओतील नर्तक हे रोबोट नसून भरतनाट्यम नृत्यांगना आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video disneyland two beautiful girls bharatanatyam dance shared as robots dancing viral clip has shocking end svs
Show comments