Easy Puran Poli Recipe video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेक जण त्यांना आलेले अनुभव किंवा त्यांना येत असलेल्या कलेचे व्हिडीओ शेअर करतात. विशेषत: रेसिपीचे व्हिडीओ तर नेटकऱ्यांच्या लवकर पसंतीस उतरतात. सध्या असाच एक रेसिपीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या सासूबाईची पुरणपोळीची रेसिपी सांगताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला पुरण पोळी सोप्या पद्धतीने कशी बनवायची याविषयी सांगताना दिसत आहे. ती सांगते, “पुरण पोळी करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे, असं मला वाटतं. या पद्धतीने पुरण पोळी माझ्या सासूबाई करतात. दिवाळीमध्ये जसे आपण करंजी लाटून घेतो त्याचप्रकारे ही पुरण पोळी बनवायची आहे.
सुरुवातीला कणीक थोडी फार लाटून घ्यायची आहे. आणि पुरणाचा गोळा त्यात भरायचा आहे. त्यानंतर ग्लास किंवा वाटीने मी जसं व्हिडीओमध्ये दाखवते तसं कापून घ्यायचे आणि त्याचे काठ आहे, ते चांगल्याने पॅक करून घ्यायचे; जेणेकरून त्यातून पुरण बाहेर पडू नये. त्यानंतर पुरण पोळी कोरड्या पिठाच्या मदतीने हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. पोळी ही नेहमी हलक्या हाताने लाटून घ्यावी. त्यामुळे ती खूप छान अशी फुगते. आणि आपल्या आवडीनुसार ती तेलाने किंवा तुपाने भाजून घ्यावी. या पद्धतीने पुरण पोळी केल्याने पोळी अगदी पातळ होते आणि काठापर्यंत पुरण लागते. ही जी पद्धत आहे, ती नक्की एकदा करून पहा.
पहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
foodholic_mind या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुरणपोळी एका वेगळ्या पध्दतीने” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वा.. मला येत नाही पण आता अस करून बघेन” तर एका युजरने लिहिलेय, “अरे वा खूप छान पद्धत” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी नक्की करून पाहीन.”