Shocking Viral Video : अनेकदा आपल्याला वेळेचे महत्त्व कळत नाही पण एका मिनिटाने किंवा एका सेकंदाने सुद्धा सर्वकाही बदलू शकते. विशेषत: अपघाताच्या वेळी एका सेकंदाचे महत्त्व कळते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका सेकंदाच्या फरकामुळे लोकांचा जीव वाचला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं प्रकरण काय आहे? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (Video : do you know importance of one second in life landslide on a highway road shocking video goes viral on social media)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भर रस्त्यात अचानक दरड कोसळली, अंगावर काटा आणणारा VIDEO Viral

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की भर रस्त्यात अचानक दरड कोसळते आणि एका सेकंदाच्या फरकाने लोकांचा जीव वाचतो. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुरुवातीला एक मोठा हायवे दिसेल. या हायवे वरून गाड्या जात आहेत आणि पाऊस पडत आहे. अचानक रस्त्याच्या एका बाजूने दरड कोसळते. त्याच्या एका सेकंदापूर्वी दोन चारचाकी तिथून जाते आणि सुदैवाने त्यातील लोक वाचतात तसेच एक ट्रक सुद्धा या चारचाकीच्या मागे येत असतो पण ज्या ठिकाणी दरड कोसळली त्या ठिकाणापासून एका सेकंदाच्या अंतरावर हा ट्रक असतो आणि हा ट्रक अपघाताचा शिकार होण्यापासून वाचतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “बघा आयु्ष्यात वेळ किती महत्त्वाची आहे. काही सेकंद जीव वाचवू शकतात.”

हेही वाचा : PHOTO: “बिझनेस करायचाय पण…” रिक्षाचालकानं रिक्षामध्ये लावलं भन्नाट पोस्टर; वाचून म्हणाल इच्छाशक्ती असली की सगळं शक्य

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

pro_capitalmotivation07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वेळ..!”

हेही वाचा : अशी वेळ कुणावरच येऊ नये; लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाच्या मृत्यूचा थरार, नेमकं काय घडलं?VIDEO आला समोर

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “स्वामी समर्थ” तर एका युजरने लिहिलेय, “वेळेचे महत्त्व समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “एका सेकंदाची किंमत…” यापूर्वी सोशल मीडियावर वेळेची किंमत सांगणारे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video do you know importance of one second in life landslide on a highway road shocking video goes viral on social media ndj