Viral Video : पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा इतिहास प्रचंड मोठा आहे. या शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाणारे हे शहर या शहराची ओळख सांगतात. या शहरात आणि शहराच्या जवळपास असे अनेक ऐतिहासिक आणि प्राचीन ठिकाणे, मंदिरं आहेत. दरदिवशी हजारो लोक या ठिकाणांना भेट देतात. काही लोक तर दुरवरून पुणे दर्शनासाठी येतात. पुण्याजवळ अतिशय सुंदर ठिकाणे आहेत ज्याविषयी अनेकांना माहिती नाही.

आज आपण अशाच एका ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत. तुम्ही मस्तानी तलावाविषयी ऐकले आहे का? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या मस्तानी तलावाविषयी सांगितले आहे. (video do you see mastani talav near by pune at Wadki village watch viral video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक भव्य असे मंदिर आणि मंदिराचा परिसर दिसेल. येथे महादेवाचे मंदिर निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे. या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर व शांत आहे. या मंदिराजवळचा तलाव हा मस्तानी तलाव म्हणून ओळखला जातो.

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार, या तलावाचे बांधकाम १७२० साली बाजीराव पेशवे यांच्या कालखंडात करण्यात आले होते. १४ एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात या मंदिर परिसरामध्ये महादेवाचे सुंदर असे मंदिर आहे या मंदिर परिसरामध्ये खूप शांतता आहे. त्यामुळे येथे आल्यावर मन प्रसन्न होते.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

loni_kalbhor_janta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “
रामदरा मंदिर पासून ८ कि.मी असलेला निसर्गरम्य मस्तानी तलाव तुम्ही पाहिला आहात का..”या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वडकीगाव”

मस्तानी तलाव हे पुणे शहरापासून २२ किमी अंतरावर आहे. हा मस्तानी तलाव सुमारे ३०० वर्ष जुना आहे. या तलावाची खासियत म्हणजे, या तलावातूनच शनिवारवाड्यात जाणारा रहस्यमयी भुयारी मार्ग आहे, असं म्हणतात. एक दिवसाच्या ट्रिपसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे.

Story img Loader