Viral Video : ‘संतूर मॉम’ विषयी तुम्ही अनेकदा ऐकले असेल. संतुर साबणाच्या जाहिरातीमध्ये खूप जास्त तरुण दिसणाऱ्या आईला उद्देशून हा शब्द वापरण्यात आला आणि नंतर तो खूप प्रचलित झाला. आपल्या आजुबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांच्या वयाचा अंदाज येत नाही आणि आपण त्यांचे खरे वय ओळखू शकत नाही. काही लोक स्वत:ला एवढे फीट ठेवतात की त्यांचे खरे वय जाणून घेतल्यानंतर कोणीही थक्क होईल. सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला ‘संतूर मॉम’ बरोबर ‘संतूर पप्पा’ सुद्धा दिसून येईल.
हा व्हायरल व्हिडीओ एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका स्टेजवर अँकरसह काही महिला उभ्या आहेत. अँकर एका महिलेला विचारतो, “किती वर्षे झाली लग्नाला” महिला सांगते, “२२ वर्षे” त्यावर अँकर आश्चर्याने म्हणतो, “२२ वर्षे.. तुम्ही संतूर मॉम सिरिअलमध्ये बघितली असेल, जाहिरातीमध्ये बघितले असेल पण संतूर मॉम येथे बघा तुम्ही” त्यावर महिला म्हणते, “अहो नवरा पण बघा ना संतूर पप्पा” त्यानंतर अँकर संतूर पप्पा म्हणून महिलेच्या नवऱ्याला हाक मारतो. महिलेचा नवरा पाहून कोणीही अवाक् होईल. तो इतका तरुण दिसतो की तरुणालाही लाजवेल. या संतूर पप्पाला पाहून कोणालाही वाटणार नाही की त्यांच्या लग्नाला २२ वर्षे झाली. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
rjprasanna20 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आता संतूर पप्पा पाहा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “असा अभिमान असला पाहिजे आपल्या बायकोला” तर एका युजरने लिहिलेय, “खूपच छान आणि प्रेमळ जोडी” आणखी एका युजरने लिहिलेय, “असा ओव्हर कॉन्फिडंस पहिजे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.