Viral Video : सोशल मीडियावर पुण्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. येथील ऐतिहासिक स्थळे, प्राचीन मंदिरं, गडकिल्ल्यांचे व्हिडीओ अनेकदा चर्चेत येतात. पुणे हे सांस्कृतिक शहर असल्यामुळे या शहराला मोठा प्राचीन वारसा लाभला आहे. पुण्यात असे अनेक ठिकाणे, वास्तू आणि मंदिरं आहे जे बघण्यासाठी लोक दुरवरून येतात पण काही मंदिरं किंवा ठिकाणे अशी आहेत ज्याविषयी लोकांना माहिती नाही.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील एक सुंदर मंदिराविषयी सांगितले आहे. हे श्री साईचं देवस्थान असून येथे अनेक देवांचे मंदिरं आहेत. हे मंदिर नेमके कुठे आहेत, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुरुवातील अतिशय सुंदर मंदिर दिसेल. मंदिर पाहून कोणीही थक्क होईल. मंदिराचा भव्य दरवाज्यातून भक्त ये जा करताना दिसत आहे. दरवाज्या आत शिरल्यावर सुंदर आणि भव्य असे साईचे मंदिर दिसेल. श्री साईची मूर्ती अतिशय सुंदर आहे. मंदिराचा परिसर अतिशय मोठा आहे. या मंदिराच्या परिसरात शंकर पार्वतीची सुंदर मूर्ती आणि सुंदर शिवलिंग दिसेल. मंदिराच्या परिसरात अन्य देवी देवतांचे सुद्धा मंदिर आहे. पुढे व्हिडीओत तुम्हाला गणपतीचे सुद्धा सुंदर मंदिर दिसेल. गणपतीच्या शेजारी अष्टविनायकाच्या म्हणजेच गणेशाच्या आठ वेगळ्या रूपातील मूर्ती आहेत. या मंदिराच्या परिसरात विष्णू लक्ष्मीची, राम लक्ष्मण सीतेची तसेच विठ्ठल रुख्मिनीची सुंदर मूर्ती आहेत . या मंदिरात दत्ताचे सुद्धा सुंदर मंदिर आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही या मंदिरात एकदा भेट द्यावीशी वाटेल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

pune_captures या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्यातील हे सुंदर मंदिर तुम्ही बघितलं का? श्री साई देवस्थान, पुणे”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आळंदी रोडजवळ सुंदर मंदिर आहे” तर एका युजरने लिहिलेय, “आळंदीमध्ये आहे दिघी रोड ला” आणखी एका युजरने लिहिलेय, “हो पाहिलं आहे खुप छान मंदिर आहे विशेष म्हणजे एकाच ठिकाणी सर्व देवी देवतांचे दर्शन घेता येते खूप छान वाटतं ,ओम साई राम” अनेक युजर्सनी हे मंदिर खूप सुंदर असल्याचे सांगितले आहेत.

Story img Loader