Viral Video: सोशल मीडियावर दर दिवशी प्राण्यांचे शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात. एखाद्या गोंडस कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होण्यास तर काही सेकंदही पुरतात. आता असाच एक ४ पायांचा स्टार सोशल मीडियावर भाव खात आहे. तुम्ही आजवर प्राण्यांचा वेग पाहिला असेल, सर्वात वेगवान प्राण्यांमध्ये कुत्र्याचा नंबर तसा बराच नंतर येतो पण हा व्हायरल व्हिडिओमधील स्टार याला नक्कीच अपवाद आहे. मालकाच्या एका इशाऱ्यावर हा कुत्रा इतक्या वेगाने पळत जातो की काही सेकंदातच तो जागेवरून गायब होतो. एक दोन सेकंदाने ज्या दिशेने कुत्रा पळत गेला आहे त्याच दिशेने ५० हुन अधिक मेंढ्यांचा कळप सुद्धा धावत येताना दिसत आहे.

नेटकऱ्यांच्या अंदाजानुसार, हा कुत्रा मालकासह मेंढ्यांचा कळप चरायला घेऊन आला असावा. सुरुवातीला तो मालकाबरोबरच बसून असतो आणि मग काही सेकंदाने तो वाऱ्यासारखा पळू लागतो. पळता पळता तो मेंढ्याच्या दिशेने जाऊन जणू काही त्यांना परत येण्यास इशारा करू लागतो. मेंढ्या सुद्धा कुत्र्याचा आदेश पाळतात आणि पूर्ण कळप एकाच वेळी एकाच दिशेने परत येतो या कळपाच्या मागेच कुत्रा सुद्धा आपल्या मालकाकडे परततो.

Video: चित्त्याहून वेगाने धावला कुत्रा

हे ही वाचा<< Video: आग, बर्फ आणि सुंदरा..पेटलेला बाण पायात धरला, खाली डोकं वर पाय अन् तरुणीने केला ‘हा’ भयंकर स्टंट

दरम्यान, हा व्हिडीओ १० मिलियनहुन अधिक वेळा पहिला गेला आहे. कुत्र्याला आज्ञाधारक , प्रामाणिक का म्हणतात याचे हे कमाल उदाहरणे आहे असे नेटकऱ्यांनी म्हंटले आहे. आजवर अनेक कुत्रे पाहिले पण असा वेगवान कुत्रा पहिल्यांदाच पाहतोय असेही काहींनी कमेंट मध्ये म्हंटले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कमेंट करून नक्की कळवा.

Story img Loader