Man Rides Bull on Road Video: सोशल मीडियावर दरदिवशी शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओची प्रसिद्धी इतकी असते की काहीवेळा मोठमोठे अधिकारी, राजकीय मंडळी, या माध्यमाचा वापर जनजागृतीसाठी सुद्धा करतात. वेगवगळ्या राज्यांच्या शहरांच्या पोलिस दलांचे सुद्धा सोशल मीडियावर पेज आहेत. अनेकदा विचित्र अपघात किंवा लोकांच्या चुकांचे व्हिडीओ, फोटो शेअर करून पोलिसही समाजाला समज देण्याचा प्रयत्न करत असतात. याच प्रयत्नांतून आता उत्तराखंडच्या पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात एक माणूस बैलावर स्वार दिसत आहे. बरं हा हुशार पठ्ठ्या बैलावर बसून जे काही करतोय ते पाहून पोलिसांनाच काय तुम्हालाही विश्वास बसने कठीण होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडिओमध्ये, एक माणूस पूर्ण वेगाने बैलावर बसून फेऱ्या मारताना दिसत आहे. “कैलास पति नाथ की जय हो.” असे म्हणत पळताना त्याने एका स्कूटीला कट मारून पुढे जाण्याचा प्रतापही केला. उत्तराखंड पोलिसांनी सुद्धा सोमवारी हा व्हिडीओ शेअर केला. या व्यक्तीवर ५ मे ला उशिरा रात्री अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्याला भविष्यात अशाप्रकारे प्राण्यांवर अत्याचार न करण्याची ताकीद देऊन सोडण्यात आले.

Video: बैलावर बसून निघाला दारुड्या, भररस्त्यात…

हे ही वाचा<< तू बिबट्या, पण मी कमी नाही! ‘या’ विचित्र प्राण्याने तीन बिबट्यांची जी अवस्था केली… Video पाहून म्हणाल, “बापरे!”

दरम्यान, अपलोड झाल्यापासून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे याला शेकडो व्ह्यूज मिळाले आहेत. यापूर्वी दोन बैल रस्त्याच्या मधोमध भांडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यूट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, एक बैल दुसऱ्याचा पाठलाग करताना आणि मारहाण करताना दिसत होता, जो नंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रॉयल एनफिल्ड बाइकवर आदळला. अशा घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढवलीये हे नक्की.