Viral Video: सोशल मीडियावरही गाळणी लावली तर हजारो लाखो टॅलेंटेड चेहरे समोर येतील. अनेकांना नशिबाने संधी मिळत नाही पण अशावेळी जिद्द सोडणे हा पर्याय नसावा. तुमच्या मेहनतीवर खुश होऊन अगदी अनपेक्षित वेळी तुम्हाला कधीही सोन्याची संधी मिळू शकते. आता हेच उदाहरण घ्या ना अलीकडेच एका दारुड्याला पोलिसांनी अटक केली होती, आता दारुडा म्हंटला की त्याला गझल, गाणी गाण्याची सवय असते हे आपणही अनेक चित्रपटांमधून पाहिलं आहे. तसाच हा ही तरुण गायक निघाला आणि चक्क अटक केल्यावर पोलीस स्टेशनमध्येच तुरुंगात बसून गाऊ लागला. नशेतही या माणसाचे सूर असे पक्के लागले की स्वतः पोलीसही त्याची वाहवा वाहवा करू लागले. एका पोलिसानेच त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला. सध्या समोर येणाऱ्या माहितीनुसार या तरुणाला आता स्टुडिओकडून गाण्याची ऑफर सुद्धा येत आहे. स्वतः

कुमारला बक्सर पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत उत्तर प्रदेशातून सीमावर्ती जिल्ह्यात अनधिकृत प्रवेश केल्याबद्दल अटक केली होती. तुरुंगामध्ये तो एक भोजपुरी गाणे गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. “दरोगाजी हो… सोची-सोची जिया हमरो काहे घबराता…” हे उडत्या चालीचे गाणे गाताना त्याचे सूर अगदी कमाल लागले होते ज्यामुळे पोलिसही चांगलेच खुश झाले

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून, केवळ नेटिझन्सच नाही तर अनेक सेलिब्रिटींनी या तरुणाच्या टॅलेंटचे कौतुक केले आहे. बॉलीवूड गायक अंकित तिवारीने देखील हा व्हिडिओ शेअर केला. त्याने व्हायरल झालेल्या मद्यधुंद व्यक्तीला त्याच्या म्युझिक कंपनीत गाण्याची ऑफर दिली. अंकितने यूपीच्या आमदाराची पोस्ट रिट्विट करत व्यक्तीला कायदेशीर मदत आणि पुनर्वसनाचे आश्वासन दिले. याशिवाय, त्याला यूपीच्या प्रसिद्ध स्टुडिओमध्ये गाण्याची संधी देण्याचे आश्वासन दिले.

हे ही वाचा<< Video: तरुणी धावत्या बाईकवर घेत होती झोका, मागून जोडपं वेगात आलं अन्.. नेटकरी म्हणतात “पप्पाची परी.. “

प्राप्त माहितीनुसार कन्हैय्या कुमार असे या २४ वर्षीय तरुणाचे नाव असून त्याला अलीकडेच बिहारमध्ये दारू पाण्यावरून अटक करण्यात आले होते. पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकले तेव्हाही तो नशेत होता. असं म्हणतात जे काही होते ते चांगल्यासाठीच होते! पण म्हणून दारू पिऊन असे नियम मोडणे हा काही पर्याय असू शकत नाही. तरीही तुम्हाला या तरुणाचे टॅलेंट कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा.

Story img Loader