Dubai Skyscrapers Cleaning Video: जगातील अनेक उंच इमारती या दुबईमध्ये आहेत. या इमारतींचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहताना सुद्धा मान दुखेल की काय अशी भीती वाटते. मग विचार करा प्रत्यक्ष या इमारती किती भव्य दिव्य दिसत असतील. केवळ दुबईतील बुर्ज खलिफाच नाही तर एकूणच जगभरात जिथे या गगनचुंबी इमारती या बाहेरून काचेच्या व लख्ख चमचमत्या असतात. अर्थात आता काच म्हंटली की धूळ, पाऊस, वारा यांनी खराब होणारच पण मग तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की या काचा कोण व कशा स्वच्छ करतं? सोशल मीडियावर सध्या दुबईतील गगनचुंबी इमारतीच्या स्वच्छतेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून एक क्षण तुम्हालाही गरगरल्यासारखं होईल यात शंका नाही.
दुबईच्या आजूबाजूला वाळवंटांचा वेढा आहे त्यामुळे धुळीची वादळे ही आता दुबईतील रहिवाश्यांना सुद्धा सवयीची झाली आहेत. अशाच धुळीच्या वादळानंतर काचेच्या गगनचुंबी इमारतीची स्वच्छता करतानाचा हा व्हिडीओ आहे. यावर चक्क बाहेरील बाजूने काही कर्मचारी दोरखंडाच्या व केबल्सच्या साहाय्याने बाहेर लटकले आहेत. हे कर्मचारी केबल्ससह स्वच्छतेचे सामानही घेऊन आले आहेत व ते खऱ्या आयुष्यातील स्पायडरमॅन सारखे इमारतीच्या काचा स्वच्छ करत आहेत.
Video: दुबईतील गगनचुंबी इमारतीची स्वच्छता
हे ही वाचा<< पाण्याची टाकी रिकामी न करता कशी स्वच्छ करायची? तरुणाचा जुगाडू Video पाहून म्हणाल, “भाई पैसे वाचले”
दरम्यान, ट्विटरवर @HowThingsWork_ या हॅण्डलवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ लुक्झॉ लोकांनी पहिला आहे. अनेकांनी यावर कमेंट करून हे किती भीतीदायक आहे यापेक्षा तुम्ही मशीनचा वापर करावा असे सल्ले दिले आहेत. तर काहींनी मशीन वापरल्यास कर्मचाऱ्यांचा रोजगार कमी होईल असे म्हणत त्या कर्मचाऱ्यांना नक्कीच भरपूर पगार मिळत असणार असे अंदाज बांधले आहेत. पगारासह या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचीही सोय करावी अशीही मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.