घरी असल्यावर पाळीव प्राण्यांसोबत खेळायला अनेकांना आवडतं. पण घराच्या बाहेर पडल्यावरही काही जण वन्य प्राण्यांना त्यांचे मित्रच समजतात. हत्तीसारखा भला मोठा प्राणी माणसांशी त्याच्या शैलीत संवाद साधताना आपण अनेक व्हिडीओंच्या माध्यमातून पाहिलं आहे. पण काही वेळेला ‘हाथी मेरे साथी’ धोकेबाजही निघतात. हत्ती हा अत्यंत शांत प्रवृत्तीचा प्राणी आहे. तुम्ही आपलं काम करा, मी माझं काम करतो अशा आवेगात तो आपलं आयुष्य जगतो. सध्या सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल होत आहेत. यात काही लोक विनाकारण प्राण्यांशी पंगा घेताना दिसत आहेत. आताही असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीला हत्तीशी पंगा घेणं चांगलंच महागात पडलंय.
हत्तीनं तरुणीला सोंडेनं उडवलं –
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक हत्ती एका महिलेवर हल्ला करताना दिसत आहे. ही महिला केळी दाखवून हत्तीचं लक्ष वेधण्याचा आणि त्याला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती. नदीच्या पात्रावर उभा असलेला हत्ती त्या महिलेजवळ येतो आणि नंतर तिला त्याच्या सोंडेने ढकलून देतो. व्हिडिओ पाहून अंदाज बांधता येतो की महिलेला किती दुखापत झाली असेल. हा थरारक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – viral video: वाघाला जवळून पाहण्याचा मोह नडला! खतरनाक वाघाचा थेट पर्यटकांवर हल्ला
माणसं असो वा प्राणी राग कुणालाही येऊ शकतो. पण हत्तीला राग येणार नाही, असं एका तरुणीला वाटलं आणि ती थेट हत्तीच्या जवळ गेली. हत्तीसोबत मस्ती करणाऱ्यांना हत्तीने कायमची अद्दल घडवल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हत्तीशी पंगा घेणं किती महागात पडू शकतो, ते हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कळू शकेल.