लोकांना हत्तींचे मजेदार व्हिडीओ पाहणे आवडते आणि असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु कधीकधी हत्तीच वेगळ रूपही या व्हिडीओमधून बघायला मिळतं. असाच एक हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात त्याने लोकांनी भरलेल्या बसवर हल्ला केलेला दिसून येतो. या दरम्यान, बस चालकाने समजूतदारपणा दाखवत हत्तीचा राग कसा शांत केला हे दिसून येते. त्यानंतर लोक आता या ड्रायव्हरच्या स्तुती करत आहेत. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अधिकाऱ्यांची पोस्ट
व्हायरल होणारा हा व्हिडीओ २५ सप्टेंबर रोजी IFS अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केला होता. त्यांनी सांगितले की ही घटना निलगिरीची आहे. जिथे एका बस चालकाने बसवर हल्ला करणाऱ्या संतप्त हत्तीला घाबरून आणि अस्वस्थ होण्याऐवजी हत्तीचा राग शांत केला आणि प्रवाशांचे संरक्षण केले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सुप्रिया साहूने लिहिले आहे, मी निलगिरीच्या या सरकारी बसचालकाचा मनापासून आदर करतो. हत्तीने हल्ला केला आणि बसची काच फोडली तरीही त्यांनी आपला कंट्रोल गमावला नाही. आज सकाळच्या घटनेत त्यांनी प्रवाशांना सुरक्षित राहण्यास मदत केली. म्हणूनच असे म्हटले जाते की शांत मन चमत्कार करते.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर आतापर्यंत ६८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
१ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ड्रायव्हर समोर हत्ती पाहताच त्याने बसची पाठ केली आणि एका बाजूला उभी केली. पण, हत्ती बसच्या मागे येतो आणि बसवर हल्ला करतो आणि त्याची विंडशील्ड तोडतो. बसमध्ये बसलेले सर्व प्रवासी घाबरून जातात. पण, ड्रायव्हर धैर्य दाखवतो आणि आपल्या सीटवरून उठतो आणि बाकीच्या प्रवाशांसह बसमध्ये मागे जातो. जेणेकरून हत्ती लोकांना पाहू शकला नाही आणि शांतपणे परत जाऊ शकेल.