EVM Broken By Mentally Challenged Person Video: २६ एप्रिल २०२४ रोजी निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू होताच, लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असलेला व्हिडिओ आढळून आला. व्हिडिओमध्ये एक माणूस मतदान प्रक्रियेदरम्यान मशीनची मोडतोड करताना दिसत आहे. तपासादरम्यान आम्हाला या व्हायरल दाव्यामागील सत्य स्थिती आढळून आली आहे.
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Megh Updates ने व्हिडीओ आपल्या प्रोफाईल वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील व्हिडीओ अलीकडील असल्याचे सांगत शेअर करत आहे.
तपास:
InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून आम्ही आमचा तपास सुरू केला. आम्हाला साक्षी टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला या घटनेबद्दलचा व्हिडिओचा अहवाल आढळून आला.
हा व्हिडिओ अकरा महिन्यांआधी अपलोड केला होता, या व्हिडीओचे शीर्षक होते: Man Breaks EVM Machine | Karnataka Elections | Garam Garam Varthalu @SakshiTVWatch
आम्हाला हि बातमी thehindu.com वर १२ मे, २०२३ रोजी अपलोड केल्याचे आढळले.
मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा संशय असलेल्या व्यक्तीने ईव्हीएम कंट्रोल युनिटचे नुकसान केल्याचे या बातमीच्या शीर्षकात म्हटले आहे.बातमीच्या मथळ्यात सांगितल्यानुसार, “म्हैसूरमधील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघांतर्गत, हुतागल्ली मतदान केंद्रावर ही घटना घडली होती.
हे ही वाचा<< “मोदी आरक्षण संपवतील आणि संविधानही..”, भाजपा आमदाराच्या विधानाने खळबळ; पण Video संपतो तेव्हा काय घडतं?
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव शिवमूर्ती असे असून त्यांचे वय ४८ वर्षे आहे. या व्यक्तीवर आयपीसीच्या कलम ८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्हाला starofmysore.com या वेबसाइटवर यासंबंधित एक बातमी देखील मिळाली.
बातमीत नमूद केले होते की, या घटनेनंतर, खराब झालेले बॅलेट कंट्रोल युनिट बदलण्यात आले आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. दरम्यान, या व्यक्तीला ताब्यात घेतलेल्या विजयनगर पोलिसांनी सांगितले की, तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता आणि चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले.
निष्कर्ष: २०२३ च्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतील मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तीने ईव्हीएमची तोडफोड केल्याचा जुना व्हिडीओ २०२४ च्या चालू असलेल्या निवडणुकीचा सांगून व्हायरल केला जात आहे. संबंधित दावा खोटा आहे.