Woman Drags Mother-In-Law By Hair: नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सुनेने तिच्या ७० वर्षीय सासूला निर्दयपणे मारहाण केली. एवढेच नाही, तर तिने तिच्या वडिलांना आणि भावाला बोलावून, तिच्या पतीलाही बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीडित आई आणि मुलाने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली आहे. या एका घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक सून आपल्या सासूला मारहाण करताना दिसतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील आदर्श कॉलनीमध्ये ही घटना घडली. येथे राहणारा विशाल बत्रा याने त्याची पत्नी नीलिका त्याचा बराच काळ मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे. विशालने तक्रारीत म्हटले आहे की, नीलिका त्याची वृद्ध आई सरला बत्रा हिला घरातून बाहेर काढून वृद्धाश्रमात सोडण्यासाठी त्याच्यावर दबाव आणत होती; परंतु विशाल त्याच्या आईची बिघडणारी प्रकृती लक्षात घेता, यासाठी तयार नव्हता. त्यावरून घरात वारंवार वाद होत असत.
घटनेच्या दिवशी विशाल कामावरून घरी परतला तेव्हा नीलिकाने तिच्या वडिलांना आणि भावाला फोन करून त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यांनी विशालला मारहाण केली. ७० वर्षीय सासू सरला बत्रा आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आल्या तेव्हा सुनेने तिचे केस धरून जमिनीवर फेकले आणि तिला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला.
सरला बत्रा यांनी सांगितले की, त्यांची सून नीलिका अनेक महिन्यांपासून त्यांना वाईट वागणूक देत होती. दररोज शिवीगाळ आणि भांडणे होत होती; पण घरात कोणताही कलह नको म्हणून तिनं तिच्या मुलाला काहीही सांगितलं नाही. जेव्हा तिच्या मुलाचा जीव धोक्यात होता, तेव्हा ती गप्प राहू शकली नाही. तिने सांगितले की, त्याला अनेक वेळा ओढण्यात आलं, जमिनीवर फेकण्यात आलं आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
विशाल आणि सरला बत्रा यांनी इंद्रगंज पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा नीलिकाचे वडील आणि भावाने त्यांना तिथेही धमकावले. त्यामुळे भीतीने आई आणि मुलगा असे दोघेही काही दिवसांपासून घर सोडून वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत.
येथे पाहा व्हिडीओ
सरला बत्रा म्हणाली की, नीलिका तिला दररोज घराबाहेर पडण्यास सांगते. ती माझ्या मुलाला त्रास देते. ती त्याला मला अनाथाश्रमात पाठवायला सांगते. मी हृदयरोगी आहे. ती मला एक महिन्यापासून त्रास देत होती. यांचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांनी सांगितले की, आमच्याबरोबर घडलेल्या घटनेची सुनावणी झाली पाहिजे. आम्हाला धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यांनी आता मारले आहे; पण पुढेही मारतील. आदर्श कॉलनीमध्ये एका सुनेकडून तिच्या सासू आणि पतीवर हल्ला झाल्याची घटना समोर आल्याचे सीएसपी रॉबिन जैन यांनी सांगितले. तक्रारदार सासूने सुनेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत असून गुन्हेगारांना कठोर शासन केलं जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.