Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. कोणी अनोखा जुगाड सांगताना दिसतो तर कोणी आजुबाजूला घडणाऱ्या अनोख्या गोष्टी कॅमेऱ्यात कैद करून शेअर करतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. नगरच्या एका तरुणाने एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडीओ शेअर केला आहे. हे वृद्ध व्यक्ती नगरच्या कापड बाजारात आले वडी विकतात. विशेष म्हणजे वयाच्या ९९ व्या वर्षी पायी फिरून ते आले वडी विकतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नगरचे माने आजोबा भर बाजारात पायी फिरून विकतात आले वडी

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण नगरच्या एका आजोबाविषयी सांगतो, “नमस्कार मी अनिश पोळ. तुम्ही जर संध्याकाळी नगरच्या कापड बाजारामध्ये गेले तर तुम्हाला हे आजोबा नक्की दिसतील आणि यांना पूर्ण नगरकर ओळखतात, असं मला तरी वाटतं. चला तर मंडळी तुम्हाला या आजोबांविषयी थोडक्यात अशी माहिती सांगतो.
या आजोबांचे पूर्ण नाव नारायण माने. हे नगरमध्ये १९५६ पासून आलेवडी विकतात. सर्दीला खोकल्याला आल्याची वडी हे त्यांचं ब्रीद वाक्य. या माने आजोबांचं वय ९९ वर्षे असून तरी पूर्ण पायी पायी बाजार फिरून विकतात आलेवडी. एवढं आजोबांचं वय असून सुद्धा ना त्यांना बीपी ना शूगर.”

हेही वाचा : …अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! फ्रिज साफ करताना महिलेला लागला विजेचा झटका, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

पुढे व्हिडीओत तरुण सांगतो, “या माने आजोबांना मी लहानपणापासून ओळखतो. त्यांचा स्वभाव सुद्धा खूप छान आहे. मी ज्यावेळी माने आजोबांबरोबर बोललो. त्यांचा थोडक्यात असा जीवनप्रवास ऐकला. खूपच प्रेरणादायी होता. या माने आजोबांकडे आले वडी मिळते आणि हे आजोबा हे आलेवडी घरीच बनवतात आणि या आलेवडीचा फरक सुद्धा कळतो. मित्रांनो, तुम्ही सुद्धा नगरच्या माने आजोबांची आलेवडी खाल्ली आहे की नाही, नक्की कमेंट करून सांगा.”

पाहा व्हायरल व्हिडीओ

anoshpolvlogs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नारायण माने आजोबांची सुप्रसिद्ध सर्दीला खोकल्याला आलेवडी”

हेही वाचा : “अरे हिम्मतच कशी होते?” भर गर्दीत तरुणानं महिला पोलिसांबरोबर काय केलं पाहा; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकं कोण चुकलं?

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बाबांचं ९९ वय असून सुद्धा ते स्वाभिमानाने जगतात.व्हिडीओ बघून खरंच खूप अभिमान वाटतो” तर एका युजरने लिहिलेय, “हे आजोबा आमच्या घराजवळून जातात बुरुड गल्ली मधून. आम्ही लहानपणी ह्यांच्या मागे मागे जायचो आणि त्यांच्या सारखे बोलायचे”

आणखी एका युजरने लिहिलेय, “हे आजोबा पंढरपूरचे आहेत आणि ते पंढरपूरमध्ये आलेपाक वडी विकत होते पण गेले वर्ष झाले ५ ते ६ वर्ष झाले. ते पंढरपूर मधून अचानक निघून गेले. सर्वांना असं वाटलं की त्यांचा मृत्यू झाला पण आता ते तिथे आहेत काय नगर ला?” अनेक युजर्सनी आजोबांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

.